22 November 2024 1:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

राज्यात ऑक्सिजन तुटवडा | मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना ३ वेळा फोन

CM Uddhav Thackeray

मुंबई, १७ एप्रिल: महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती रोज चिंताजनक होत चालली आहे. वाढत्या कोरोनामुळे राज्यात ऑक्सिजन, रेमेडेसिविर, लस सगळ्याच गोष्टींचा आता तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या २४ तासांत ३ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक आणि ऑक्सिजन तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला १२०० ते १५०० मेट्रीक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली होती.

या दोघांमध्ये महाराष्ट्रातील आणि मुंबईतील ऑक्सिजनचा तुटवड्याबाबत चर्चा झाली आहे. काल मुंबईतील काही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमरता होती. त्यामुळे काही रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले होते. त्यावरुनच उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना फोन करुन, महाराष्ट्रातील चिंताजनक परिस्थिती कळवली आहे.

राज्यात ऑक्सिजनचा साठाही अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधांन नरेंद्र मोदी यांनाच फेसबुकवरून लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजनचा साठा आणण्यास परवानगी द्यावी, असं आवाहन केलं होतं. उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिलला संचारबंदी जाहीर करताना, जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी ऑक्सिजन तुटवड्याची माहिती दिली होती.

पंतप्रधानांशी माझी नुकतीच बैठक झाली आहे. त्यात त्यांना ऑक्सिजनची मागणी केली आहे. इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांच्याकडे केला आहे. त्यांनी परवानगीही दिली आहे. मात्र, ईशान्येकडील राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मुख्यमंत्र्यांच्या या मागणीला काय प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नाही, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ही परिस्थिती देशातील अनेक राज्यांमध्ये आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आढावा बैठक घेतली. त्यांनी सध्याच्या ऑक्सिजन साठा, निर्मिती आणि पुरवठ्याची माहिती घेतली. पंतप्रधानांनी कोरोनाने सर्वाधिक त्रस्त असलेल्या 12 राज्यांमध्ये पुढील 15 दिवस ऑक्सिजन पुरवठा कसा होईल याची माहिती घेतली. प्रत्येक ऑक्सिजन प्लांटची क्षमता वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या टँकर्सवर कोणतेही निर्बंध घालू नका, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

 

News English Summary: The condition of the corona in Maharashtra is becoming increasingly critical. Due to the rising corona, the state is now short of oxygen, remedicivir and vaccines. Against this backdrop, Chief Minister Uddhav Thackeray has called Prime Minister Narendra Modi three times in the last 24 hours. The situation has become critical due to corona eruption and oxygen shortage in Maharashtra. That is why Maharashtra should get 1200 to 1500 metric tons of oxygen, was demanded by Uddhav Thackeray to the Prime Minister.

News English Title: CM Uddhav Thackeray has called PM Narendra Modi three times in the last 24 hours for oxygen during corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x