17 April 2025 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

कोरोनाचा धोका कायम | राज्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ आणू नका - मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray, corona crisis, Lockdown

मुंबई, २२ नोव्हेंबर: दिवाळीनंतर कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रविवारी पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांनी खूप सहकार्य केलं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी ज्या धीराने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबवली त्याचं त्यांनी कौतुक केलं. रुग्ण संख्या आटोक्यात असली तरी धोका टळलेला नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोरोनाची दुसरी लाट ही लाटच नसून ती त्सुनामी असेल असा इशारीही त्यांनी दिला.

राज्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ येवू नये असंही ते म्हणाले. आत्ताच कोरोनाचा अटकाव करा असंही ते म्हणाले. राज्यात हे उघडा ते उघडा अशी मागणी करणारे कोरोना वाढला तर जबाबदारी घेणार का? असा सवाल करत त्यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली.

“जनतेची जेवढी जबाबदारी सरकारच्या माध्यमातून माझ्यावर आहे. तेवढी हे उघडा ते उघडा म्हणणाऱ्यांवरती नाही. मी जसं आपल्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे मी प्रार्थनागृह उघडले पण ती उघडली म्हणजे तिथं गर्दी करु नका,” असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं.

 

News English Summary: After Diwali, the number of Corona (Covid-19) patients is increasing once again. Against this backdrop, Chief Minister Uddhav Thackeray once again interacted with the people of the state on Sunday. The Chief Minister said that the citizens cooperated a lot in the fight against Corona. He appreciated the patience with which the health workers of the state carried out the campaign “My Family, My Responsibility”.

News English Title: CM Uddhav Thackeray informed about corona crisis during addressing the state news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Uddh(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या