25 December 2024 9:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा | शेतकऱ्यांना २५ हजारांचे मदतीचे धनादेश

CM Uddhav Thackeray, Solapur Tour

सोलापूर, १९ ऑक्टोबर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आजपासून पाहणी दौरा सुरू होत असून बारामतीमधून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्या, पार्श्वभूमीवर भाजपा नेते आमदारगोपीचंद पडळकर यांनी मंत्र्यांच्या आणि खासदार शरद पवार यांच्या दौऱ्यावरुन राज्य सरकारवर टीका केलीय.

राज्यात गेल्यावर्षीही नोव्हेंबर महिन्यात काही भागांत अतिवृष्टी झाली होती, तेव्हाही पवारसाहेबांनी विरोधी पक्ष म्हणून पाहणी दौरा केला होता. तेव्हा त्यांनी हेक्टरी 25 ते 30 हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती. मात्र, काही दिवसांत ते सत्तेत आले, सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांना या घोषणांचा विसर पडला. विदर्भात महापूर आला, कोकणात चक्रीवादळ आलं पण तिथंही या सरकारकडून मदत मिळाली नाही. आताही महाराष्ट्र पाण्याखाली गेलाय, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय आणि तुम्ही दौरे करताय. पवारसाहेबांना बांधावर जावं लागतंय, मग सरकार काय करतंय, असा प्रश्न भाजपा नेते आमदारगोपीचंद पडळकर यांनी विचारलाय.

दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सकाळी पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही होते. सांगवी येथील नुकसानीची पाहणी करून गावक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. नुकसानभरपाई देण्यासाठी शासन खंबीर आहे. गावक-यांनी धीर सोडू नये, अशा शब्दांत ठाकरे यांनी ग्वाही दिली.

दक्षिण सोलापूर तालुक्यात रामपूर येथे नुकसानीची पाहणी केल्यानंतर ठाकरे यांनी गावक-यांशी संवाद साधला. यावेळी संकटग्रस्तांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येकी २५ हजारांच्या मदतीचे धनादेश ठाकरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. याप्रसंगी संवाद साधताना गावक-यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांना मुख्यमंत्र्यांनी धीर दिला.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील सांगवी येथील नुकसानीची पाहणी केल्यानंतर अक्कलकोट येथील भोसले संस्थानकालीन हत्ती तलावाचीही पाहणी केली. त्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूर येथेही ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली. केंद्र सरकारकडे राज्य सरकारचे येणे आहे. हे येणे वेळेत दिले गेले तर सध्याच्या अतिवृष्टी व पुराच्या आपत्तीत केंद्राकडे मदत मागावी लागणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला. राज्य आणि केंद्र असा दुजाभाव होऊ नये, असेही त्यांनी सुनावले.

 

News English Summary: After inspecting the damage at Rampur in South Solapur taluka, Thackeray interacted with the villagers. On this occasion, a check of Rs 25,000 each was distributed to the victims in the form of a representative. The villagers were moved to tears while interacting on the occasion. He was reassured by the Chief Minister.

News English Title: CM Uddhav Thackeray Solapur stock of the situation caused by torrential rains News updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x