25 November 2024 2:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Corona Pandemic | केंद्राचाही सतर्कतेचा इशारा | मुख्यमंत्री उद्या संपूर्ण लॉकडाऊन घोषणा करणार

Maharashtra Lockdown

मुंबई, २० एप्रिल: महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा पुर्ण लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही आज किंवा उद्या महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे सुतोवाच केले आहे. आज ( २० एप्रिल) राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी सर्व नेत्यांनी आपल्या जिल्ह्यातील स्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. त्यामुळे लॉकडाऊन लावावा असाच सर्व मंत्र्यांचा आग्रह असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता लॉकडाऊन बाबत काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच, १५ दिवसांची संचारबंदी राज्यात लागू आहेच. तसेच, किराणा मालदाची दुकाने आणि अन्य अत्यावश्यक गोष्टींची दुकाने सकाळी ७ ते ११ याच वेळेत सुरु राहणार असल्याची नियमावली आज जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आज किंवा उद्या महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन होणार असल्याचे संकेत मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. १५ दिवसांचा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लॉकडाऊन अत्यंत कडक असायला हवा अशी सगळ्यांचीच मागणी आहे. निर्बंध घालूनही रस्त्यावरून वाहनं फिरत आहेत. आम्ही सगळ्यांनीच मुख्यमंत्र्यांना तात्काळ कठोर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असं सांगितलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्यापासून हे नियम लागू करतील. लॉकडाऊन हा काही आवडीचा विषय नाही. आज लोकांना बेड, ऑक्सिजन मिळत नाहीयेत. ऑक्सिजनच्या उत्पादनापेक्षा आपल्याला जास्त ऑक्सिजन लागत आहे. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण होऊन लोकांचा उपचार न मिळता मृत्यू होईल. म्हणून ही चेन ब्रेक करण्यासाठी आपल्याला कठोर लॉकडाऊन करायचा आहे”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

 

News English Summary: Everyone wants the lockdown to be very strict. Despite the restrictions, vehicles are moving on the road. We have all told the Chief Minister that there is no alternative but immediate immediate lockdown. Therefore, Chief Minister Uddhav Thackeray will implement these rules from tomorrow said minister Eknath Shinde news updates.

News English Title: CM Uddhav Thackeray will announced strict lockdown on tomorrow news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x