23 April 2025 4:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी ७ वाजता जनतेशी संवाद साधणार

CM Uddhav Thackeray, Corona Crisis

पुणे, २१ फेब्रुवारी: महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत आहे.अमरावती ,यवतमाळ,अकोला अशा ठिकाणी कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे.पुण्यामध्येसुद्धा आजपासून रात्रीची संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

मुख्यमंत्री आज सायंकाळी ७ वाजता सोशल मिडीयाच्या माध्यमातुन हा संवाद साधणार आहेत.महाराष्ट्रात कोरोना परिस्थितीमध्ये काही कडक नियम लावले जाणार का ? लाॅकाडऊन सारखा निर्णय घेतला जाणार का असे अनेक प्रश्न सध्या जनतेत आहेत.त्यामुळे मुख्यमंत्री आज कोणती महत्वाची आणि मोठी घोषणा करतात का याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मागील काही दिवसांपासून रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकार काही निर्बंध लादणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते काही महत्त्वाच्या घोषणा करु शकतात. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांनी पुन्हा लॉकडाउन केला जाऊ शकतो, असा इशारा यापूर्वीच दिला होता. यामुळे आता मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

News English Summary: Corona is spreading day by day in Maharashtra. Strict rules are being enforced in Amravati, Yavatmal, Akola. A curfew has also been declared in Pune from today. In all these circumstances, Chief Minister Uddhav Thackeray will interact with the people of the state today.

News English Title: CM Uddhav Thackeray will interact with the people of the state today news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या