कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी
मुंबई, १६ एप्रिल: दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अशाकाळात मजुर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीबांसाठी राज्यसरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत असल्याचे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान गुरुवारी (१४ एप्रिल) पहिल्याच दिवशी तब्बल ९६ हजार ३५२ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले तर आज दुपारपर्यंत ९८ हजार ९८५ थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले असल्याची माहितीही छगन भुजबळ यांनी दिली.
कोरोना प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाने काल मोफत शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचे आदेश निर्गमित केले त्यानंतर सर्वच केंद्रांनी कोरोनाचे सर्व नियम व राज्य सरकारने आखुन दिलेल्या नियमानुसार शिवभोजन थाळीचे मोफत वितरण केल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
मागील अनेक दिवस समाज माध्यमांवर शिवभोजन थाळीवर टीका केली जात आहे. मात्र गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजनवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पहावी आणि मग समाज माध्यमात व्यक्त व्हावे असे मतदेखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
दरम्यान, राज्य सरकारने कडक निर्बंध जाहीर केले तेव्हा गोरगरिबांचे पोट भरणारी शिवथाळी खायला कोण येणार असा प्रश्न भाजपचे आमदार राम कदम यांनी उपस्थित केला होता. मात्र आता ते तोंडघशी पडल्याचं चित्र आहे. राम कदम यांनी ट्विट करताना म्हटलं होतं की, “कडक संचारबंदी लागू असताना लोक शिवथाळी खायला जाणार कसे? का वसूलीसरकारचा पैसे मोजणाऱ्या मशीनला व्यस्त ठेवण्यासाठी नवीन प्रयत्न?
कडक संचारबंदी लागू असताना लोक #शिवथाळी खायला जाणार कसे? का #वसूलीसरकार चा पैसे मोजणाऱ्या मशीनला व्यस्त ठेवण्यासाठी नवीन प्रयत्न? #vajhegang
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) April 14, 2021
News English Summary: After the Corona outbreak, the Food and Civil Supplies Department issued an order yesterday to distribute free Shivbhojan Thali as per the package announced by the Chief Minister, after which all the centers distributed Shivbhojan Thali free of cost as per all the rules of Corona and the rules laid down by the state government, said Minister Chhagan Bhujbal.
News English Title: Common peoples slams BJP MLA Ram Kadam over crowding for Shivbhojan Thali news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO