रिपोर्टनुसार फडणवीस सरकारच्या काळातच सर्वाधिक महिला अत्याचार

मुंबई, २७ मार्च: सध्या महिला अत्याचारावरून भारतीय जनता पक्षाचे नेते महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत असले तरी सर्वाधिक महिला अत्याचार हे फडणवीस सरकारच्या काळात आसल्याच उघड झालं आहे. त्यामुळे भाजप नेत्यांचे दावे अधिकृत आकडेवारीतून खोटे ठरत आहेत.
भाजप सरकारच्या तुलनेत महाविकासआघाडी सरकारच्या काळात महिला व बालकांवरील अत्याचारांचे प्रमाण हजारोंच्या संख्येने घटले आहे. गतवर्षीचा आढावा घेणाऱ्या यंदा प्रकाशित झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात महिला व बालकांसंदर्भात ही बाब समोर आली होती.
महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होण्याआधी फडणवीस सरकारच्या काळात 2018 साली महिला अत्याचाराचे 35, 501 तर 2019 साली 37,112 इतके गुन्हे नोंदवण्यात आले होते. महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर 2020 साली मात्र महिला अत्याचाराच्या प्रमाणात 10 हजारांपेक्षा जास्त संख्येने घट झाली असून महिला अत्याचाराच्या 26,586 इतक्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसेच 2018 मध्ये बालकांवरील अत्याचाराचे 15,544 तर 2019 मध्ये 17,517 गुन्हे नोंद झाले होते. 2020 साली मात्र बालकांवरील अत्याचाराचे हे प्रमाण तब्बल 6 हजारांनी घटून बालकांवरील अत्याचाराच्या 11,154 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात महिला व बालकांवरील अत्याचाराचा वाढता आलेख महाविकासआघाडी सरकारच्या काळात हजारोंच्या संख्येने घटल्याची बाब यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आली होती. गुन्हे अन्वेषण विभागाच्या आधारावर आर्थिक पाहणी अहवालात ही आकडेवारी सादर करण्यात आली होती.
तत्पूर्वी, नॅशनल रेकॉर्ड क्राइम ब्युरोने देशाच्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा गुन्हेगारी २०१६चा अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची सविस्तर माहिती देण्यात आली होती. त्या वर्षात देशात महिला अत्याचाराच्या एकूण तीन लाख ३८ हजार ९५४ घटना घडल्या होत्या. २०१५’च्या तुलनेत २०१६ मध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारासागत गुन्ह्यांत तीन टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होता आहे. विनयभंग व छेडछाडीच्या गुन्ह्यात महाराष्ट्र राज्य त्यावर्षी देखील पहिले, अपहरणाच्या गुन्ह्यात दुसरे आणि बलात्काराच्या गुन्ह्यात तिसरे असल्याचे समोर आले होते.
देशात २०१६ बलात्काराच्या ३८ हजार ९४७ घटना घडल्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक घटना मध्य प्रदेश (चार हजार ८८२), उत्तर प्रदेश (चार हजार ८१६) आणि महाराष्ट्र (चार हजार १८९) या राज्यात घडल्या होत्या.
News English Summary: Though BJP leaders are currently blaming the Mahavikas Aghadi government for the atrocities against women, it has been revealed that most of the atrocities against women took place during the Fadnavis government. Therefore, the claims of BJP leaders are being falsified by official statistics.
News English Title: Compared to the BJP government the number of atrocities against women and children has decreased by thousands during the Maha Vikas Aghadi government news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA