25 December 2024 10:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

नारायण राणेंविरोधात बार्शी पोलिसांत तक्रार दाखल | मुख्यमंत्र्यांवर टीका भोवली

Police Complaint, MP Narayan Rane, Barshi

बार्शी , २९ ऑक्टोबर: भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायण राणे यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. दरम्यान राणे यांनी मुख्यमंत्र्यावर टीका करताना ‘गांडूळ, पुळचट’ यासारखे शब्द वापरले होते, त्यामुळे त्यांच्यावर बार्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान राणे यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांचा अपमान केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी बार्शी पोलीस ठाण्यात नारायण राणेंविरोधात तक्रार दिली, त्यावरुन कलम ५०४, ५०६ नुसार अदखलपात्र एनसी दाखल करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांना बेडूक आणि बेडकाची पिल्ले, अशा अप्रत्यक्ष शब्दांत टोले लगावले होते. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा अक्षरश: पाणउतारा केला आहे.

 

News English Summary: A complaint has been lodged against Bharatiya Janata Party MP Narayan Rane in Solapur district, with Narayan Rane criticizing state Chief Minister Uddhav Thackeray at a lower level. Meanwhile, Rane had used words like ‘earthworm, pulchat’ while criticizing the Chief Minister, so a complaint has been lodged against him at the Barshi police station.

News English Title: Complaint against MP Narayan Rane in Barshi for insulting CM Uddhav Thackeray News updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x