27 December 2024 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | मल्टिबॅगर HUDCO सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: HUDCO Income Tax on Salary | 5 लाख रुपयेपर्यंत वार्षिक पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी खुशखबर, बजेटमध्ये घोषणा होणार EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा IPO Watch | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह तपशील जाणून घ्या - IPO GMP HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
x

राऊतांना भेटीसाठी २ तास देत फडणवीसांनी राजकीय अस्थिरतेचा सापळा रचला? - राजकीय ठोकताळा

MP Sanjay Raut, Devendra Fadnavis, Meeting, MahaVikas Aghadi

मुंबई, २९ सप्टेंबर : तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत गुप्त भेट झाली. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये तब्बल २ तास ही भेट झाल्याचं सांगण्यात आलं. दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ही भेट झाल्याचं सांगण्यात आलं. TV9 मराठीने याबाबत वृत्त दिलं होतं.

मात्र प्रसार माध्यमांना पक्की खबर मिळाली होती तर त्यांचे कॅमेरे प्रत्यक्ष ग्रँड हयात हॉटेलच्या गेटवर किंवा आजूबाजूला का फिरकले नाहीत हे विशेष. दुसरं म्हणजे मुख्य रस्त्यावर बऱ्याच अंतरावरून कॅमेऱ्यात फडणवीसांची गाडी दाखवण्यात आली. वास्तविक कोणत्याही राजकीय बैठकीबाबत माध्यमांना खबर लागताच तिथे येणाऱ्या सर्व वाहनांना ते घेरतात हे नित्याचे झाले आहे. मग देवेंद्र फडणवीस यांची गाडी मोठ्या अंतरावरून सोशल डिस्टंन्सीगचे नियम पाळून कॅमेऱ्यात कोणी कैद केली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

सदर भेट ही फडणवीस यांच्या सामनातील मुलाखतीच्या आधी काही विषयांवर चर्चा करण्यासाठी घेतल्याचं संजय राऊत आणि फडणवीस यांनी देखील बातमी पसरल्यावर सांगितलं. मात्र दुपारी तब्बल २ तासांची वेळ राऊतांना देणाऱ्या फडणवीसांभोवतीच संशयाचं वर्तुळ फिरताना दिसतंय, ज्यामध्ये संजय राऊत देखील अडकल्याचे राजकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

ज्या गोष्टींची चर्चा फोनवर करणे शक्य आहे, त्यासाठी फडणवीसांनी दुपारच्या जेवणाची वेळ निवडणं आणि लंचच्या नावाने ती २ तास ताणून धरणं आणि त्यानंतर अचानक एका कॅमेऱ्यात फडणवीसांची गाडी लांबून कैद होणे हा घडवून आणलेला क्षण असल्याचं म्हटलं जातंय आणि याची योजना फडणवीसांचीच होती असं देखील म्हटलं जातंय. त्यांच्या गाडीची व्हिडिओ किल्प रेकॉर्ड करणं त्याचाच भाग म्हटलं जातंय. राऊत फडणवीसांना २ तास भेटायला तर नक्की आले नसणार, पण जेवणाची वेळ निवडून ते कसे २ तास खिळून राहतील याची काळजी घेतली. सगळा कार्यक्रम त्या २ तासांमुळे फसला आणि महाविकास आघाडीत पुन्हा राजकीय अस्थिरतेचं वातावरण निर्माण करण्यात भाजप यशस्वी झालं हे नक्की म्हणावं लागेल.

नुकतंच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील अशी परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे दोन महत्वाचे नेते २ तास भेटून चाय बिस्किटावर बोलत नाही असं म्हणत त्या २ तासांवर अधिक जोर दिला आणि राऊतांनी एवढे २ तास कशावर चर्चा केली याची उत्तर देण्यास त्यांना भाग पाडलं . त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राजभवनात जाऊन सांगावं लागेल असा टोला लगावला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेबद्दलही खुलासा केला. ते माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत यांनी फडणवीस भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “राजकीय चर्चा करणं गुन्हा आहे का ? जर दोन राजकीय नेते भेटत असतील तर देशाबद्दल, कृषी विधेयकं, जम्मू काश्मीर, चीन, पाकिस्तान, कोविडबद्दल चर्चा होते”. विशेष म्हणजे संजय राऊत आणि फडणवीस जम्मू काश्मीर, चीन, पाकिस्तानवर चर्चा करून कोणते दिवे लागणार होते. मुळात जम्मू काश्मीर, चीन, पाकिस्तान कोविडवर चर्चा करण्यासाठी त्यांनी फडणवीसांची भेट घेऊन २ तास चर्चा केली हा विनोदच म्हणावा लागेल.

मात्र राऊतांवर अशी उत्तरं देण्याची वेळ आली आहे आणि त्याच कारण म्हणजे फडणवीसांनी ठरवून रचलेला २ तासाचा खेळ म्हणावं लागेल. ज्याचं मुख्य कारण म्हणजे राज्यात राजकीय अस्थिरता कायम असल्याचं चित्र निर्माण करणं आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेनेला भाजपभोवती घुटमळत ठेऊन, त्यांच्यात संभ्रम कायम ठेवणं हाच हेतू होता. संजय राऊतांनी शरद पवारांना या भेटीबाबत कल्पना दिली असेल की नाही याबाबत सांगणं कठीण आहे, मात्र फडणवीसांनी भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांना ही कल्पना नक्कीच दिली असणार. याच घडामोडीमुळे राऊतांविरोधात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत देखील संभ्रम वाढला आहे. परिणामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडीतील सर्वच आमदारांना टप्प्या टप्प्याने भेटण्याची वेळ आले आहे. मात्र फडणवीस त्यांच्या २ तासांच्या योजनेत यशस्वी झाले आहेत असंच म्हणावं लागेल.

 

News English Summary: If top leaders of 2 different political parties meet, political discussions do take place. If they sat together for 2-2.5 hours, they didn’t discuss tea-biscuits. But it was inconclusive: Chandrakant Patil, Maharashtra BJP chief on meeting between Sanjay Raut and Devendra Fadnavis said Chandrakant Patil.

News English Title: Conclusion over MP Sanjay Raut and Devendra Fadnavis meet in Mumbai Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x