22 November 2024 5:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोनाबाधित मंत्र्यांना अँब्युलन्स, इस्पितळ आणि बेड्स वेळेवर; सामान्यांचा वाली कोण?..सविस्तर

state Public Works Minister Ashok Chavan, Corona virus

मुंबई, २५ मे : काँग्रेस नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली आहे. रविवारी त्यांना नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईत अशोक चव्हाण यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत. अशोक चव्हाण यांना रुग्णवाहिकेतून मुंबईला आणलं जात असून या प्रवासासाठी १२ तास लागणार आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांच्यावरील पुढील उपचाराला सुरुवात होईल. मुंबईमधील लिलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

त्यांना कोरोनाची लागण झाल्या असल्याच्या वृत्ताला मुंबईतील कार्यालयाने दुजोरा दिला आहे. अशोक चव्हाण हे गेल्याच आठवडय़ात मुंबईहून नांदेडला गेले होते. मुंबईतून गेल्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं. यावेळी त्यांनी आपली करोना चाचणीही करुन घेतली होती. नांदेडमधील रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता संसर्ग झाल्याचं निषन्न झालं.

राजकीय नेत्यांना वेळेवर ऍम्ब्युलन्स आणि उपचार मिळत असतील तर ती चांगली गोष्टच आहे. परंतु सामान्य लोकांच्या बाबतीत अगदी उलटा अनुभव असल्याचं पाहायला मिळत आहे. सामान्य लोकांना ना इस्पितळाबाबत समजत आणि बेड्सबद्दल देखील काही माहिती मिळत नसल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे मुंबई सारख्या शहरात महापालिकेने लोकांच्या सेवेसाठी वॉर्ड निहाय नेमलेले वैद्यकीय अधिकारी सामान्यांचे फोन देखील उचलत नसून अनेकांनी मोबाईल बंद ठेवल्याची तक्रार लोकं करत आहेत.

त्यात पडण्यामागे मोठ्या प्रमाणावर भोंगळ कारभार सुरु असून, रुग्ण राम भरोसे रुग्णालयात असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच रुग्णांना पाणी देखील देण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी येत असल्याचा आरोप रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. त्यामुळे मंत्र्यांना कोणत्याही अडचणी येत नाहीत, मात्र आम्हा सामान्यांच्या बाबतीत उलटाच अनुभव असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर करत आहेत. त्यामुळे भविष्यात लोकांचा उद्रेक झाल्यास हेच विषय सरकारची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: Congress leader and state Public Works Minister Ashok Chavan has contracted coronavirus. On Sunday, he was admitted to a private hospital in Nanded for treatment. But it has been decided to move him to Mumbai for further treatment. As a result, Ashok Chavan will undergo further treatment in Mumbai.

News English Title: Congress leader and state Public Works Minister Ashok Chavan has contracted coronavirus News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x