16 April 2025 6:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन

Congress leader Eknath Gaikawad

मुंबई, २८ एप्रिल | मुंबई कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले आहे.

एकनाथ गायकवाड हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते. तसेच त्यांनी राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविलं होतं. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. सगळ्यात मोठ्या झोपडपट्टी भागावर म्हणजेच धारावीवर त्यांची पकड होती. इतकंच नाही तर एकनाथ गायकवाड यांना दलित चळवळीतील कार्यकर्तेही मानत होते.

एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. जोशींचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. त्यानंतर दोनवेळा ते दक्षिण मध्य मुंबईतून विजयी झाले होते. मात्र, नंतर शिवसेनेचे नेते राहूल शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव केला होता.

 

News English Summary: Senior Mumbai Congress leader and former MP Eknath Gaikwad has passed away. Eknath Gaikwad, father of Maharashtra School Education Minister Varsha Gaikwad, has died due to corona. He is undergoing treatment at Breach Candy Hospital in Mumbai. He died during this treatment.

News English Title: Congress leader Eknath Gaikawad passes away due to covid 19 news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या