18 January 2025 7:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

मराठा आरक्षण | संभाजीराजे, उद्याच मुंबईला या, सतेज पाटलांनी दिलं निमंत्रण

Maratha reservation

कोल्हापूर, १६ जून | मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा आज (१५ जून) कोल्हापुरात निघत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतीयांच्या नेतृत्त्वात या मराठा मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. त्यानुसार हा मोर्चा निघत आहे. हे आंदोलन मूक असणार आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शाहु महाराजांच्या समाधीस्थळावरुन याची सुरुवात झाली आहे.

या आंदोलनाची टॅगलाईन “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय” अशी आहे. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं संभाजीराजे म्हणाले. या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करणे आमचं कर्तव्य, सर्वोच्य न्यायालयातील वकिलांची टीम आपण बदलली नाही. केंद्र आणि राज्याच्या समनव्याची जबाबदारी संभाजीराजे तुमची आहे, राजेंनी मांडलेल्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक आहे, मुख्यमंत्री आणि प्रमुख मंडळींना आपल्यासोबत बसून चर्चा करायची, उद्या तुम्ही मुंबईलाला यावं, उद्या मुख्यमंत्री, अजितदादा भेटतील आहे, महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रण देतो, हातात हात घालून चालायला हवं, संयमाच्या भूमिकेचं कौतुक आहे, संयमाला चर्चेची साथ देऊ, राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही देतो, असं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा कोल्हापुरात निघाला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हा मराठा मूक मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघातील शिवसेना खासदार धैर्यशील माने यावेळी सलाईन लावून मराठा मोर्चात सहभागी झाले. महाराष्ट्रातील सर्व 48 खासदार आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं, असं आवाहन मानेंनी मोर्चाच्या सुरुवातीला भाषणातून केलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Congress leader Satej Patil says Sambhajiraje should come to Mumbai for Maratha Reservation issue news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x