8 January 2025 11:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स
x

देशाची तरुणाई २०२४ मध्ये मोदी सरकार उलथवून लावेल - सुनील केदार

Congress leader Sunil Kedar

मुंबई, २७ जुलै | देशातील वाढत्या महागाईने लोकांचे नुकसान केले आहे. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर सर्वाधिक युवकांचे नुकसान झाले आहे. देशातील तरुण हे बेरोजगार झाले आहे. यामुळे हे युथ येणाऱ्या 2024 निवडणुकीत हे भाजपचे सरकार उलथून लावतील आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असा इशारा राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला. ते नागपुरात संविधान चौकात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या हल्ला बोल आंदोलना दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलत होते.

युवक काँग्रेसच्या वतीने सध्याच्या वाढत्या महागाई विरोधात सोमवारी हल्ला बोल आंदोलन केले. यावेळी युवक काँग्रेसने महागाई आणि मोदी सरकार विरोधात हातात फलक घेऊन वाढत्या महागाईचा विरोध केला. यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मोर्चाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे ही यावेळी आले होते.

यावेळी बोलताना म्हणाले लोकशाही पद्धतीने सरकार टिकवायचे असेल तर लोकांच्या विश्वासाने ही टिकवली पाहिजे. पण हे सरकार लोकांना धमकवण्याचे काम करत आहे. पण या सरकारला विसर पडला आहे की, ही जनता इंग्रजांना घाबरली नाही तर या तानाशाहीला काय घाबरणार नाही. 2024 मध्ये या सरकारला घराचा रस्ता पहावा लागेल हे आवाहन आहे असेही मंत्री सुनील केदार यावेळी म्हणाले. पण युथ काँग्रेस असो की काँग्रेस असो हे सामान्य माणसाच्या पाठीशी आहे.

आंदोलनमहागाईने सामान्य लोकांच्या हाताबाहेर:
महागाई आटोक्याच्या बाहेर गेली आहे. या महागाईमुळे सर्व सामान्य नागरिकांचे जीवन हैराण झाले आहे. आपले कुटुंब कसे चालावे, मुलांना शिक्षण कसे द्यावे, मुलीचे लग्न कसे करावे एखादी मोठी समस्या आल्यास कसे तोंड द्यावे या विवंचनेत अडकला आहे.

यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही पायदळ मार्चमध्ये सहभाग घेतला. यात भाजप सरकारन ज्या पद्धतीने हुकूमशाहीने वागत आहे. लोकांचाईडी, सीबीआयच्या माध्यमातून दडपशाहीने काम करत आहे. फोन टॅपिंग करून हेरगिरी केली जात आहे हे सर्व संविधाना विरोधी काम चालू आहे, जीवनावश्यक वस्तू किमती वाढल्या, पेट्रोल डिझेलच्या किमतीने महागाई वाढली आहे, जनतेचे आर्थिक शोषन केले जात आहे. या विरोधात काँग्रेस पक्ष युवा हे रस्त्यावर उतरून काम करत आहे म्हणत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress leader Sunil Kedar slams Modi govt over inflation news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x