27 December 2024 8:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

मोदीजी एवढंच सांगा की नाल्यातून केवळ गॅस काढता येतो की 'ऑक्सिजन' सुद्धा काढला जाऊ शकतो? - काँग्रेस

Oxygen shortage

नवी दिल्ली, ०६ मे : देशभर सध्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे इस्पितळं अत्यंत दबावाखाली आहेत. त्यात केंद्राकडे प्रभावी ऑक्सिजन वितरण प्रणाली नसल्याने अनेक ठिकाणी परिस्थिती अजूनच गंभीर होत चालली आहे. त्यात दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला ऑक्सिजनच्या व्यवस्थापनासाठी मुंबई मॉडल स्वीकारण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या ऑक्सिजन व्यवस्थापनाची सुप्रीम कोर्टाने स्तुतीही केली आहे.

दिल्लीत गेल्या काही आठवड्यांपासून ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे दिल्लीकरांना ऑक्सिजनसाठी वणवण भटकावे लागत आहे. याप्रकरणी आधी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आलं आहे. यावेळी कोर्टाने मुंबई महापालिकेने ज्या पद्धतीने ऑक्सिजनचं व्यवस्थापन केलं. ते मॉडल दिल्ली सरकारने अवलंबावं. दिल्ली सरकारने मुंबई महापालिकेकडून काही चांगल्या गोष्टी घ्याव्यात, असं कोर्टाने म्हटलं आहे. न्यायामूर्ती चंद्रचूड यांनी हा सल्ला दिला.

दुसरीकडे दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाल्यातून गॅस निर्मितीची अजब संकल्पना समोर आणली होती, जी नाल्यातच वाहून गेली आहे. दरम्यान, याच विषयाचा सध्याच्या ऑक्सिजन तुटवड्याशी संबंध जोडत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक खोचला सवाल केला आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, “मोदीजी एवढंच सांगा की नाल्यातून केवळ गॅस काढता येतो की ‘ऑक्सिजन’ सुद्धा काढला जाऊ शकतो?’, असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला आहे.

 

News English Summary: On the other hand, two years ago, Prime Minister Narendra Modi had come up with a strange concept of gas production from the Nala, which has been carried away in the Nala itself. Meanwhile, Congress spokesperson Atul Londhe-Patil has linked the issue to the current oxygen shortage and asked Prime Minister Narendra Modi a tough question. In it, he said, “Modiji, just tell me that only gas can be extracted from the nala or even ‘oxygen’ can be extracted?”

News English Title: Congress spokesperson Atul Londhe Patil criticized PM Narendra Modi over oxygen shortage issue during corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x