6 January 2025 4:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

जिवंत असलेल्यांना इस्पितळं नाहीत अन मृतांना स्मशान | आणि पंतप्रधान भाषणं देत आहेत

Congress Atul Londhe

मुंबई, १४ एप्रिल: देशात कोरोनाचा वेग सलग वाढवणारा आहे. सोमवारी 1 लाख 60 हजार 694 नवीन रुग्ण आढळले. 96,727 बरे झाले आणि 880 जणांचा मृत्यू झाला. हा सलग दुसरा दिवस होता जेव्हा नवीन रुग्ण 1 लाख 60 हजारांपेक्षा जास्त आढळले. रविवारी 1 लाख 59 हजार 914 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

देशात आतापर्यंत जवळपास 1.37 कोटी लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 1.22 कोटी बरे झाले आहेत. 1 लाख 71 हजार 89 जणांनी जीव गमावला आहे. अॅक्टिव्ह रुग्ण म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांची संख्या या महिन्यात 11 दिवसांमध्येच 6 लाख 78 हजार 519 नी वाढली आहे. 1 एप्रिलला 5 लाख 80 हजार 387 अॅक्टिव्ह रुग्ण होते. जे वाढून 12 लाख 58 हजार 906 झाले आहेत. सोमवारी यामध्ये 62,946 ची वाढ झाली.

एका बाजूला देशात कोरोना आपत्ती टोकाला पोहचलेली आहेत आणि आरोग्य व्यवस्था सामान्यांना अपुरी पडत असल्याचं चित्र आहे. मात्र दुसरीकडे देशाचं नैतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र प्रचारात व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रकोप वाढत असताना देखील मोदींनी त्यांच्या प्रचार कार्यक्रमात कोणताही बदल केल्याचं पाहायला मिळत नाही. त्यालाच अनुसरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोदींना टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “जिवंत असलेल्यांना रुग्णालय सापडत नाही आणि मृतांना स्मशानभूमी नाही. अरेरे! आणि आमचे पंतप्रधान दिवस रात्र आणि काही अंतरावरून भाषणं देत आहेत”

 

News English Summary: On the one hand, the Corona disaster has reached its peak in the country and the health system is inadequate for the common man. On the other hand, Prime Minister Narendra Modi, who is leading the country, is seen campaigning. What is special is that even as the Corona outbreak is on the rise, Modi does not seem to have made any changes in his campaign.

News English Title: Congress spokesperson Atul Londhe slams Modi over elections rally during nation under corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x