15 November 2024 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News
x

परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वाझे काम करत होता | भाजपचा खोटेपणा उघडकीस येतोच - सचिन सावंत

Congress spokesperson Sachin Sawant, BJP, Sachin Vaze case

मुंबई, ७ एप्रिल: मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. सचिन वाझे यांची पुनर्नियुक्ती परमवीर सिंग यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्तांनी गृह खात्याला पाठवलेला अहवाल प्रसार माध्यमांच्या हाती लागला आहे.

तत्कालीन पोलीस सह आयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या‌ नियुक्तीला विरोध असतानाही परमवीर सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली, असा खुलासा अहवालात करण्यात आला आहे. वाझे सर्वसाधारण पोलीस निरीक्षक असतानाही ते थेट परमवीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. विविध हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास परमवीर सिंग यांच्या सांगण्यानुसार वाझेंकडे‌ देण्यात आला होता, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

सचिन वाझे यांच्या टीममधल्या व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांना रिपोर्टिंग करण्यास मनाई करण्यात आली होती. हायप्रोफाईल प्रकरणात‌ मंत्र्यांच्या ब्रीफिंगवेळी परमवीर सिंग यांच्याबरोबर सचिन वाझेसुद्धा हजर राहायचे. सीआययूचे रिपोर्टिंग तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे असल्याची माहिती आहे. सरकारी गाड्या उपलब्ध असताना वाझे मर्सिडिज, ऑडी या वाहनांनी कार्यालयात यायचे, याकडे अहवालात लक्ष वेधले आहे.

दरम्यान, यासंदर्भात ट्विट करताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करताना म्हटलं कि, “मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह मंत्रालयाला दिलेल्या अहवालात परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वाझे काम करत होता हे स्पष्ट केले व त्यांच्या निकटच्या संबंधांवर प्रकाश टाकला आहे. मी पत्रकार परिषदेत जे सांगितले ते नेहमीप्रमाणे सत्य ठरले. भाजपाचा खोटेपणा अखेर उघडकीस येतोच”.

 

News English Summary: Mumbai Police Commissioner Hemant Nagarale in his report to the Home Ministry clarified that Sachin Vaze was working under the guidance of Parambir Singh and shed light on their close relationship. What I said at the press conference came true as usual. The lies of the BJP are finally being exposed said congress spokesperson Sachin Sawant.

News English Title: Congress spokesperson Sachin Sawant criticised BJP over Sachin Vaze case news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x