23 December 2024 5:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

परमबीर सिंग म्हणालेले वाझेला सांगितले पण त्याने ते ऐकले नाही, जर अपराधच घडला नाही तर धाडी कसल्या? - काँग्रेस

Sachin Sawant

मुंबई, २४ एप्रिल: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर सीबीआयने टाकलेल्या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या कारवाईवरून मोदी सरकारवर संशय व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टाने केवळ प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मग गुन्हा आणि धाडी का टाकल्या असा भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

तब्बल 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने शनिवारी छापे टाकले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे मुंबईपासून ते नागपूरपर्यंतच्या अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. एकूण दहा ठिकाणी हे छापे मारले आहेत. मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळीतील सुखदा इमारतीतील फ्लॅटवर पहाटेच सीबीआयने छाप मारले आहेत.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिलेली असताना काँग्रेसने देखील या कारवाईवरून संशय व्यक्त केला आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील टीका करताना काही प्रश्न देखील उपस्थित केलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना सचिन सावंत म्हणाले की, “CBI’ने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करेल हे अभिप्रेत होतेच. या संस्थानी केलेली कारवाई म्हणजे आता जोक झाला आहे. मोदी सरकारच्या कोरोना हाताळण्याच्या अपयशापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे आणि मविआ ला बदनाम करण्याकरिता ही मोदी सरकारच्या निर्देशाने केलेली राजकीय नौटंकी आहे.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “ज्यांच्या बोलण्यावरून गुन्हा दाखल झाला तो वाझे स्वतः गुन्हेगार आहे. परमबीर सिंह यांनी आयुक्त‌असताना माहिती कळल्यावर गुन्हा दाखल केला नाही यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. वाझे म्हणतो की त्याला सांगितले पण त्याने ऐकले नाही. जर अपराधच घडला नाही तर धाडी कशावर टाकता? हे सर्व कुभांड आहे”.

 

News English Summary: After the CBI raid on the properties of former state Home Minister Anil Deshmukh, the NCP has become very aggressive. Many NCP leaders have expressed doubts about the Modi government over this action. The Supreme Court had only ordered a preliminary inquiry. Then the BJP has been attacked for committing crimes and raids.

News English Title: Congress spokesperson Sachin Sawant criticized Modi Govt over CBI raided on Anil Deshmukh house news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x