22 December 2024 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

छत्रपती संभाजीराजेंच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे - काँग्रेस

Maratha reservation

मुंबई, २४ मे | मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस पेटत चालला आहे. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी संभाजीराजेंना भेटले का नाही यावर देखील पाटील पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजे यांनी त्यांचं मत मांडलं आहे. विनायक मेटे यांनीही आपली बाजू मांडली. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं तर भाजपचे कार्यकर्ते त्यामध्ये पक्षाचा झेंडा आणि बॅनर बाजूला ठेवून सहभागी होतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फार सविस्तरपणे बोलणे टाळले.

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मात्र भाजपवर आता सडकून टीका करताना भाजपच्या राजकारणावरून देखील खडेबोल सुनावले आहेत. यासंदर्भात ट्विट करताना सचिन सावंत म्हणाले की, “मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. मोदींची विषयांची समज फार कमी आहे. मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही. छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे.

 

News English Summary: However, Congress spokesperson Sachin Sawant, while criticizing the BJP, has also slammed the BJP’s politics. In this regard, Sachin Sawant tweeted, “Chandrakant Patil has clarified three things. Modi’s understanding of the subject is very low. Modi did not understand the subject of Maratha reservation. The title Chhatrapati in the name of Chhatrapati Sambhaji Raje is only worth Modi’s use in elections said Sachin Sawant.

News English Title: Congress spokesperson Sachin Sawant criticized PM Narendra Modi over Maratha reservation issue and not giving meet timing for Chhatrapati Sambhajiraje news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x