23 February 2025 2:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

2019 मध्ये प्रचारजीवी पंतप्रधानांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात आणले तेव्हाच कोरोनाचा प्रसार झाला

Congress Nana Patole

पंढरपूर, १५ एप्रिल: लहानपणी आई आम्हाला सांगायची की घरात भांडी वाजवली तर दारिदय्र येतं. पण पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशालाच ताट वाजवायला लावली, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (१५ एप्रिल) केली. चीनमधील कोरोना भारतात कसा आला याची चर्चा झाली पाहिजे. 2019 मध्ये आपल्या प्रचारजीवी पंतप्रधानांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात आणले तेव्हाच कोरोनाचा प्रसार झाला, असा दावा यावेळी नाना पटोले यांनी केला.

ते गुरुवारी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली. मोदी महाराजांनी जनता कर्फ्युच्या नावाखाली थाळ्या वाजवायला सांगितल्या. त्यानंतर दिवे लावण्याचा उद्योग केला. या काळात मुस्लिम समाजामुळे कोरोना पसरतो, असं सांगून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला.

आतादेखील देशात कोरोनाची मोठी साथ पसरली आहे. आपण चौथ्या स्टेजमध्ये आहोत. आतापर्यंत देशाच्या पंतप्रधानांनी यावर उपाययोजना जाहीर करायला हव्या होत्या. देशात सध्याच्या घडीला केवळ दोन कंपन्यांनाच लस तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. आपले शत्रू असलेल्या पाकिस्तानला लस पुरविली जात आहे. मात्र, राज्यांना लसी दिल्या जात नाहीत, असे नाना पटोले यांनी म्हटले. नाना पटोले असं म्हटले असले तरी दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे 2018 मध्ये दोन्ही नेत्यांची चीनच्या वुहानमध्ये औपचारिक शिखर परिषद झाली होती.

 

News English Summary: How the Corona from China came to India should be discussed. Nana Patole claimed that the corona spread in 2019 when his campaigning prime minister brought the Chinese president to India.

News English Title: Congress state president Nana Patole at Pandharpur Magalvedha for Bharat Bhalke campaign news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NanaPatole(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x