25 November 2024 5:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

फडणवीस म्हणजे तपास यंत्रणा आहेत का? | त्यांनी आरोप केल्यावर कोणालाही दोषी ठरवायचे का?

Congress, Nana Patole, Devendra Fadnavis, CDR issue

मुंबई, २५ मार्च: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करावं असं विधान केलं आहे. त्यानंतर संजय राऊत यांच्या विधानावर काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे नाना पाटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन सीडीआर देतात, पुरावे देतात. पण मुळात फडणवीसांकडे हे पुरावे आलेच कसे? राज्यात एटीएसनं अतिशय योग्यपणे तपास करत अंतिम टप्प्यात तपास आलेला असतानाच एनआयए कोर्टात जाऊन तपास स्वत:कडे घेतं. फडणवीसांनी आरोप केले म्हणजे प्रत्येकाला दोषी ठरवून राजीनामा घेत बसायचं का?

दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील संजय राऊतांच्या वक्तव्यावर चांगलाचं समाचार घेतला आहे. “शिवसेना युपीएचा घटक नाही. त्यांनी आधी युपीएचा घटक व्हावं आणि मग त्यांना बोलण्याचा अधिकार असेल. त्यांना सातत्याने काही ना काही लिहावं लागतं. त्यामुळे ते सातत्याने अशा मागण्या करत असतात. एकदा सांगूनही ते पुन्हा पुन्हा त्यांना सांगावं लागतं. राज्यातली आघाडी एका विशिष्ट परिस्थितीत आहे. वैचारिक भिन्नता असूनही भाजपाचा विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. युपीए हे राष्ट्रीय दल आहे. त्यामुळे याबाबत बोलण्याचा त्यांना अधिकार नाही”, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis goes to Delhi and gives CDR, gives evidence. But how did Fadnavis get this evidence? The NIA goes to court and takes over the investigation while the ATS is in the final stages of investigation in the state. Fadnavis’s allegation means that everyone should be convicted and resign? said Nana Patole.

News English Title: Congress state president Nana Patole criticising Devendra Fadnavis over CDR issue news updates.

हॅशटॅग्स

#NanaPatole(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x