पेट्रोल डिझेल दर वाढीविरोधात काँग्रेस सोमवारी जोरदार आंदोलन छेडणार
मुंबई, २६ जून : आज काँग्रेसच्या वतीने राज्यभरात लडाखच्या गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल सुनील बाबू यांच्यासहित 20 जवानांना आदरांजली वाहण्यासाठी “शहीदों को सलाम” दिवस आयोजित करण्यात आला होता. त्याचवेळी झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारने सतत 19 दिवस चालू ठेवलेल्या डिझेल, पेट्रोल यांच्या दरवाढीचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच येत्या सोमवारी 29 जूनला काँग्रेस पक्ष संपूर्ण महाराष्ट्रभर पेट्रोल- डिझेल दरवाढीविरोधात आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्याविरोधात आंदोलन करणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले.
बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, “काँग्रेस २९ तारखेला पेट्रोल आणि डिझेलची जी भाववाढ चालली आहे त्याविरोधात एक तासाचं आंदोलन करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. यासोबत केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात येणार आहे. इंधनाचे दर वाढत असल्याने अर्थ्यवस्थेला मोठा धक्का बसत आहे”.
काँग्रेसच्या यूपीएच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले होते. तरीही केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे भाव आता आहेत तेवढे कधीच वाढविले नव्हते. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाचे भाव कवडीमोल झाले आहेत. तरीही भाजपाचे केंद्रातील मोदी सरकार आपल्या अंदाजपत्रकातील तोटा भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर अव्वाच्यासव्वा एक्साईज कर लादून गरिबांच्या खिशातून पैसा काढून घेत आहे. एकीकडे कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या उद्योगधंद्यांमुळे लोकांचे रोजगार बुडाले आहेत. लोकांकडे कमाईचे कुठचेही साधन नाही. अशावेळी मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये भरमसाठ दरवाढ करून देशभरात महागाईचा आगडोंब उसळविलेला आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत. डिझेलचे भाव कधी नव्हते ते 80 रुपयांच्यावर गेले आहेत.
News English Summary: According to the information given by Balasaheb Thorat, “Congress is going to hold an hour-long agitation on the 29th against the increase in petrol and diesel prices. The agitation will be held in front of the Collector office.
News English Title: Congress Will Protest Against Central Government Over Petrol Diesel Price Hike News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो