15 November 2024 6:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

पुण्यात कोरोनाची सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर घरीच उपचार

Pune, Corona Virus, Asymptomatic

पुणे, ११ जून: मुंबईपाठोपाठ पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोनाबाधितांवर आता रुग्णालयाऐवजी घरीच उपचार केले जाणार आहेत. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबतची माहिती दिली.

कोरोनाची सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना ही सुविधा मिळणार आहे. ज्या कोरोनाबाधित रुग्णांचे घर मोठे आहे. त्यांच्याकडे स्वतंत्र किचन, बेडरुम, बाथरुम आणि केअर टेकर आहेत, या रुग्णांवरच घरी उपचार करण्यात येतील, अशी अट पालिकेने ठेवली असून झोपडपट्टी किंवा वस्त्यांवरील रुग्णांना रुग्णालयातच उपचार दिले जाणार आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने दहा हजाराचा टप्पा ओलांडला आहे. या पार्श्वभूमीवर येथील कोरोनाबाधित रुग्णांना घरीच विलग करुन त्यांच्या उपचाराची व्यवस्था उभारली जाणार आहे. या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टर फोनवरुन सल्ला देतील. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी आणि अत्यवस्थ रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी पालिका प्रशासनाने हा उपाय सुचवला आहे, असे पुणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं होतं की, Asymptomatic म्हणजेच लक्षण नसलेल्या रुग्णांपासून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका कमी आहे. WHOच्या एपिडेमिओलॉजिस्ट मारिया वॅनकर्खोव्ह यांनी सांगितले की, बर्‍याच देशांमध्ये कोरोनाचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. निम्म्याहून अधिक एसिंम्प्टोमॅटिक प्रकरणे नवीन प्रकरणांमध्ये आढळून येत आहेत, परंतु या संक्रमित रुग्णांकडून संसर्ग होण्याची धोका कमी आहे.

WHO कडून आलेले हे विधान आधी आलेल्या बातम्यांपेक्षा वेगळे होतं. जेव्हा मार्च आणि एप्रिल महिन्यात वेगवेगळ्या देशांमध्ये एसिंम्प्टोमॅटिक रुग्णांची संख्या वाढली होती, तेव्हा असे मानले जाते की अशा संसर्गांमुळे Covid-19 झपाट्यानं पसरत आहे.

 

News English Summary: After Mumbai, the number of corona sufferers in Pune is increasing rapidly. In Pune, which has become a hotspot for corona, corona sufferers will now be treated at home instead of in a hospital. Additional Commissioner of Pune Municipal Corporation Rubel Agarwal informed about this.

News English Title: Corona sufferers will now be treated at home instead of in a hospital says Additional Commissioner of Pune Municipal Corporation Rubel Agarwal news latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x