21 April 2025 6:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER
x

बीडच्या कंटेन्मेंट झोनमध्ये भाजप आमदाराचा लोकांशी संवाद; गुन्हा दाखल

Beed, Containment zone, Covid 19, FIR

बीड, १९ मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे बीडमध्येही कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. शहरात तणावपूर्ण वातावरण असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी कंटेन्मेंट झोनमध्ये प्रवेश केला होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यामध्ये १२ रुग्ण सापडले आहेत. शहरात यापैकी काही असल्याने काही भाग कन्टेन्मेंट घोषित करण्यात आला आहे. मात्र, आधीच भीतीचे वातावरण असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी कंटेन्मेंट झोनमध्ये प्रवेश केला. यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाकडून शहरातील काही परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. परंतु, आमदार सुरेश धस यांनी कंटेन्मेंट झोनमध्ये घुसून लोकांशी संवाद साधला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेन्मेंट झोनमध्ये प्रवेश करून नागरिकांशी संवाद साधल्या प्रकरणी अखेर सुरेश धस यांच्यावर संचारबंदी आदेश डावलल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने कन्टेन्मेंट झोनमध्ये बंदी घातली आहे. मात्र, आमदार सुरेश धस यांनी यामध्ये येत नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. यामुळे त्यांनी संचारबंदीचे आदेश मोडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी मधील पाटण सांगवी या कंटेन्मेंट झोन परिसर म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात सुरेश धस यांनी प्रवेश केला होता. यापूर्वी देखील ऊसतोड कामगारांना सोडवण्यासाठी जिल्हा बंदी डावलून गेल्याप्रकरणी धस यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

 

News English Summary: The number of coronary heart disease patients in Maharashtra is increasing day by day. Beed, on the other hand, has also been hit by coronary heart disease. BJP MLA Suresh Dhas had entered the containment zone amid tense situation in the city. A case has been registered against him in this regard.

News English Title: corona virus BJP MLA Suresh Dhas enters Beeds covid 19 containment zone FIR registered News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या