पुण्यात ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता | त्याची संख्या कमी आहे हे खरे आहे - उपमुख्यमंत्री
पुणे, ५ सप्टेंबर : राज्यातील काही भागात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर मिळत नाहीत. त्याची संख्या कमी आहे हे खरे आहे. परंतू, येत्या काही काळात राज्यातील ऑक्सिजन सिलिंडरचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्याती नागरिकांनीही स्वत:च्या आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. आवश्यकता भासल्यास कोरोना व्हायरस चाचणी करुन घेतली पाहिजे. मास्क, सॅनिटायझर वापरायला हवे, असे अवाहनही अजित पवार यांनी केले आहे. कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता अजित पवार यांनी पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली.त्याचे ओझे नव्याने सुरू करण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलवर पडले. त्यामुळे तिथली व्यवस्थेत पुरता गोंधळ उडाला. शहरात अपेक्षित असताना ऑक्सिजनच्या सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय ही परिस्थिती वास्तव आहे. तसेच गंभीर रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या देखील तक्रारी समोर येत आहे.
पुण्यातली कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाखांवर गेली ही जरी सत्य परिस्थिती असली तरी ८२ हजार जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. ही आपल्या दृष्टीने सकारात्मक बाब म्हणावी लागेल. रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी प्रशासन यंत्रणांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. त्याचप्रमाणे अनेक लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वांनी नियमांचे पालन करून काळजी घेणे गरजेचे आहे.
News English Summary: Deputy Chief Minister Ajit Pawar said the number of corona cases in Pune has increased significantly in the last few days. The situation is real as the city is experiencing a shortage of oxygen cylinders as expected. There are also complaints that ambulances are not available to critical patients on time.
News English Title: Coronavirus oxygen cylinder quantity in the state will be increased says deputy chief minister Ajit Pawar Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC