10 January 2025 5:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर उच्चांकी पातळीवरून 18 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून स्टॉकबाबत महत्वाचे संकेत - NSE: VEDL Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH Patel Engineering Share Price | 48 रुपयांच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, 55% परतावा मिळेल - NSE: PATELENG EPF Provident Fund | तुम्हाला सुद्धा 50 हजार पर्यंत पगार आहे का, तुमच्या EPF खात्यात 2.5 कोटी रुपये जमा होणार, कसे पहा
x

आज राज्यात १७ हजार ४३३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद | २९२ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Corona Virus, Covid19, Marathi News ABP Maza

मुंबई, २ सप्टेंबर : महाराष्ट्रात आज आणखी १७ हजार ४३३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, २९२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८ लाखांच्या वर गेली आहे. यापैंकी २५ हजार १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५ लाख ९८ हजार ४९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ७२.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात ४२ लाख ८४ हजार करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ८ लाख २५ हजार ७३९ करोना चाचण्या सकारात्मक आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १ हजार ६२७ रुग्ण आढळले. त्यानंतर पुण्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ९८ हजार ६९५ झाली आहे. तर आज दिवसभरात ४३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. आतापर्यंत पुण्यात २ हजार ३७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात करोनावर उपचार घेणार्‍यांपैकी १ हजार ४०८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती पुणे पालिकेकडून देण्यात आली.

 

News English Summary: Today newly 17433 patients have been tested as positive in the state. Also newly 13959 patients have been cured today, totally 598496 patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are 201703. The patient recovery rate in the state is 72.48% said Health Minister Rajesh Tope.

News English Title: Coronavirus Patients Numbers Increased In Maharashtra Deaths Also Increase Almost 6 Lakh People Won On Corona marathi news live latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x