17 April 2025 3:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

उर्मिला मातोंडकरांवर कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप | जिल्हा प्रशासनाचे चौकशीचे आदेश

Corona Pandemic

मुंबई, १४ ऑगस्ट | बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्या उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात कोरोनाच्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील आहे. येथे एका हॉटेलच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी नियमांचे पालन करण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

मेदिनीनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात कोरोनासंबंधी निर्बंधांचे उल्लंघन झाल्याची तक्रार स्थानिकांनी प्रशासनाकडे केली अशी माहिती उपायुक्त शशी रंजन यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे हॉटेल प्रशासनाने मात्र आरोप फेटाळले असून नियमांचे पालन झाल्याचा दावा केला आहे.

उर्मिला मातोंडकर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या अशी माहिती हॉटेल प्रशासनाने दिली आहे. कोरोनामुळे आपण या कार्यक्रमासाठी दोन तासांऐवजी एक तासच उपस्थित राहू असे उर्मिला मातोंडकर यांनी कळवले होते असंही त्यांनी सांगितले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Covid 19 rules violation at Urmila Matondkars program to be probed news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UrmilaMatondkar(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या