21 April 2025 5:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

लसीचा तुटवडा, पण 18 ते ४४ वयोगटातील लसीकरणाला सुरुवात | मुंबईत 'या' ठिकाणी मिळणार लस

Vaccination

मुंबई, १ मे | देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस भयंकर होत असताना दिसत आहे. शुक्रवारी येथे विक्रमी 4 लाख 1 हजार 911 नवीन संक्रमित आढळले. हे जगातील कोणत्याही देशामधून एका दिवसात मिळालेल्या संक्रमितांचा सर्वात मोठा आकडा आहे. एवढेच नाही तर हा आकडा सर्वात जास्त संक्रमित अमेरिकेमध्ये मिळालेल्या नवीन रुग्णांपेक्षा सात पटींनी जास्त आहे. येथे शुक्रवारी 58,700 केस समोर आल्या. संपूर्ण जगात 8.66 लाख नवीन रुग्णांची ओळख झाली आहे. यामधून जवळपास अर्धे (46%) भारतातच आढळले आहेत.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार झपाट्यानं होत आहे. अशात कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी केंद्रानं आजपासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज काही राज्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होत आहे. तर, काही राज्यांनी लसींच्या तुटवड्याचं कारण देत आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यास असमर्थता दर्शवली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारनं लसीच्या तुटवड्याचा हवाला देत आजपासून सुरू होणाऱ्या 18 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरण मोहिमेला असमर्थता दर्शवली आहे. मात्र. तरीही मुंबईमध्ये अनेक ठिकाणी लसीकरणाला सुरुवात झाली आहे, ही बाब दिलासादायक आहे. बीएमसीनं सांगितलं, की 1 मेपासून मुंबईमध्ये अठरा वर्षावरील व्यक्तींना लस मिळेल. बीएमसीनं दिलेल्या माहितीनुसार, नायर हॉस्पिटल, बीकेसी जम्बो फॅसिलिटी, कूपर हॉस्पिटल, सेवन हिल्स हॉस्पिटल आणि राजावाडी हॉस्पिटलमध्ये आजपासून अठरा वर्षांवरील व्यक्तींना लस मिळेल. या केद्रांवर 20 हजार लोकांना लस दिली जाईल.

 

News English Summary: The Maharashtra government, citing shortage of vaccines, has shown inability to vaccinate persons above 18 years of age starting from today. Only. However, the fact that vaccination has started in many places in Mumbai is reassuring. BMC said that from May 1, people above the age of 18 will be vaccinated in Mumbai.

News English Title: Covid 19 vaccination for age group between 18 to 44 in Maharashtra started news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या