६ कोरोना योद्धाचं निलंबन, कोरोना आपत्तीत वसई-विरार आयुक्तांचं फुलटाईम राजकारण
विरार, १८ जुलै : सध्या वसई विरार महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. परिस्थिती चिंताजनक असली महत्वाचं विद्यमान पालिका आयुक्त गंगाथरण डी यांना फुलटाईम राजकारण करण्यातच रस असल्याचं पाहायला मिळतंय. वास्तविक साध्याचं वसई विरारमधील त्यांची कार्यशैली पाहता त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. यापूर्वी देखील अधिकारांचा गैरवापर केल्याने मुंबई हायकोर्टात खटला दाखल करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
राज्यातील सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सर्वाना सोबत घेऊन काम करत असताना वसई विरारचे आयुक्त अधिकारांचा गैरवापर करून आरोग्य यंत्रणेत अजून गोधळाचं वातावरण निर्माण करत आहेत. मनसेने देखील त्यांच्या याच उर्मट पणाला उर्मटपणे प्रतिऊत्तर दिलं होतं.
त्यानंतर कोरोना आपत्तीसंबंधित मूळ प्रश्नांना बगल देत प्रशासकीय यंत्रणा मनसेची शाखा तोडण्यासाठी खर्ची घातली होती. त्यानंतर एका महिला कर्मचाऱ्याने त्यांच्यावर थेट आरोप करत पालिका आयुक्त त्यांना स्वतःच्या घरची धुनी-भांडीची कामं करण्यास भाग पडल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे याच विषयाला अनुसरून एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आयुक्तांविरुद्ध खटला दाखल केला असता, न्यायालयाने त्यांच्यावर अधिकारांचा गैरवापर केल्याच्या अनुषंगाने चांगलेच झापले होते.
मात्र त्याच विषयाला अनुसरून आणि कोरोना आपत्तीच्या बहाण्याने आयुक्तांनी वसई विरार महापालिकेतील एकूण सहा सफाई कर्मचाऱ्यांवर कामचुकारपणाचा ठपका ठेऊन त्यांना नोकरीतून निलंबित केल्याचं वृत्त आहे. दरम्यान, कोरोना आपत्तीत राज्य सरकार कोरोना योध्याना सांभाळून घेत असताना वसई विरारचे आयुक्त राजकीय खुन्नस काढण्याचं राजकारण करत असल्याचं समोर आलं आहे. उद्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यास काय परिस्थती उद्भवेल याची कल्पना आयुक्तांना नसावी.
News English Summary: Currently, the number of corona patients in Vasai Virar Municipal Corporation area is increasing rapidly. It is important to note that the situation is worrisome and the present Municipal Commissioner Gangatharan D is only interested in full time politics.
News English Title: Currently the number of corona patients in Vasai Virar Municipal Corporation area is increasing rapidly News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH