15 November 2024 4:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

‘निसर्ग’ चक्रीवादळ ताशी ११० कि.मी वेगाने दुपारी एक नंतर अलिबागला धडकणार

Nisarga Cyclone, NDRF Team, Maharashtra

मुंबई, ३ जून: कोरोना या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करत असतानाच एका नैसर्गिक संकटानं महाराष्ट्राच्या दारावर थाप मारली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती व्यक्त करण्यात आहे. यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच किनारपट्टीला सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, वादळाआधीच मंगळवारी रात्रीपासून किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या किनाऱ्यावर धडक देईल. या चक्रीवादळाचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर इतका असेल. काही भागांमध्ये वादळाचा वेग १२० किमी प्रतितासपेक्षा जास्त असू शकतो, असा धोक्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे. ‘चक्रीवादळाचा धोका पाहता मुंबई, पालघरसह किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाप्रमाणेच आपण यादेखील संकटाचा हिमतीनं आणि धैर्यानं मुकाबला करू,’ असं उद्धव ठाकरे राज्यातल्या जनतेला संबोधित करताना म्हणाले.

 

News English Summary: Cyclone Nisarga has become a severe cyclonic storm, it’s 200km away from Mumbai. The cyclone is moving northeasterly towards Alibag in Raigad. The severe cyclonic storm is likely to cross south of Alibag between 1 pm to 3pm:IMD Mumbai,Maharashtra; Visuals from Alibag Beach News latest updates.

News English Title: Cyclone Nisarga has become a severe cyclonic storm its 200km away from Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x