22 January 2025 4:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने सांगलीत पुराचा धोका

Danger of flood, Sangli, water level of Krishna and Warna rivers

सांगली, ६ ऑगस्ट : जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सांगली जवळ कृष्णा नदीची पाणीपातळी २० फूट इतकी झाली आहे. त्यामुळे सांगलीत पुराचा धोका कायम आहे. दरम्यान, मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे वारणा धरण ८१ टक्के भरले आहे.

शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वारणा धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, काखे मांगले आणि कोकरूड रेठरे पुल पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला जाऊ शकतो, त्यामुळे वारणा नदी काठच्या ग्रामस्थांनी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सायंकाळपर्यंत पावसाची संततधार चालूच होती. ढगांची दाटी कायम असून भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून त्यानंतर जोर कमी होणार आहे.

बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदल्या गेलेल्या चोवीस तासातील आकडेवारीनुसार जिल्ह्यात सरासरी २५.४३ मिलिमीटर पाऊस झाला. मिरज तालुक्यात २९.९, तासगावमध्ये १८, कवठेमहांकाळमध्ये १४.४, वाळवा-इस्लामपूरमध्ये २९, शिराळ्यात ७९.७, कडेगावमध्ये ३0, पलूसला २0.८, खानापूर-विटा येथे १३.६, आटपाडीत १.७, जतमध्ये ४.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

वारणा धरणात सध्या २६.३३ म्हणजेच ७६.५२ टक्के पाणीसाठा झाला असून कोयना धरणात ६0.२८ म्हणजेच ५७.२७ टक्के पाणीसाठा आहे. वारणा धरणातून ९५0 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

 

News English Summary: It is raining heavily in the district. The water levels of Krishna and Warna rivers have risen sharply. The water level of Krishna river near Sangli has risen to 20 feet. Therefore, the risk of floods in Sangli remains.

News English Title: Danger of flood in Sangli big increase in water level of Krishna and Warna rivers News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x