22 February 2025 2:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

गडकरींचं मंत्रालय निधी देतंय | सूक्ष्म आणि लहान मंत्रालयातून काय निधी मिळणार? | ते पूर्वीचं अवघड खातं

DCM Ajit Pawar

मुंबई, २७ ऑगस्ट | करोना संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांनी करोना त्याच्या नियमावली संदर्भात प्रशासनाला काही सूचना केल्या. यावेळी त्यानी सध्या राज्यात घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलेल्या खात्यावर निशाणा साधला. त्यांच्या मंत्रालयाकडून काय निधी मिळणार असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

गडकरींचं मंत्रालय निधी देतंय, सूक्ष्म आणि लहान मंत्रालयातून काय निधी मिळणार?, ते पूर्वीचं अवघड खातं – DCM Ajit Pawar criticized union minister Narayan Rane :

सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?. निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकतं. गडकरी साहेबांनी यापूर्वी निधी दिला आहे. काम पण चालली आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होतं. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे. आता त्याच्या नावात काही बदल झाले आहेत.

पोलीस कारवाईवर भाष्य:
पोलिसांनी लगेच नारायण राणेंवर कोणती कारवाई केली नव्हती. त्यांचे काही लोकं कोर्टात गेलं आणि कोर्टानं नाकारलं. हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. ते झाल्यानंतर पुढच्या गोष्टी घडल्या.”प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. या चौघांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर सांगितलं फिरा. आता मंत्रिपद मिळाल्यानंतर फिरणं भाग आहे. प्रत्येकाने जर भान ठेवून वक्तव्य केलं असतं तर हे प्रसंग आले नसते.”, असं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना अजित पवार यांनी सांगितलं. तसेच राज्यपाल काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असून आम्ही त्यांची १ सप्टेंबरला भेट घेणार आहोत असही त्यांनी सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: DCM Ajit Pawar criticized union minister Narayan Rane news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x