18 April 2025 12:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

फोन टॅपिंग प्रकरण | भाजपाच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांना हस्तक्षेप करण्याची विनंती

BJP, Devendra Fadnavis, Bhagat Singh Koshyari

मुंबई, २४ मार्च: अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, मुंबई पोलिसचे माजी कमिश्नर परिमबीर सिंह यांच्या 100 कोटीच्या वसुलीचा आरोप आणि ट्रान्सफरच्या नावावर लाचखोरीच्या आरोपांदरम्यान भारतीयाजनात पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली आहे. परमबीर सिंह, ट्रान्सफर वाद आणि सचिन वाझेंच्या प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांना हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे.

अधिकाऱ्यांमध्ये आतंक आहे. त्यांना बदलीची आणि कारवाईची भीती दाखविली जात आहे. राज्यामध्ये भ्रष्टाचार, बदल्यांचे रॅकेट आहे अशी या ठाकरे सरकारची 100 प्रकरणे राज्यापालांना दिल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. जे गोपनिय अहवाल सांभाळू शकत नाहीत, ते राज्य काय सांभाळणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यपालांना भेटून आल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.

तर राज्याचे मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्याप्रमाणे या बदली रॅकेटवर सरकारने काय कारवाई केली, हे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा ही आमची मागणी असल्याचं भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. १०० हून अधिक मुद्दे आम्ही राज्यपालांच्या निर्दर्शनास आणून दिल्याचं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Amid allegations of extortion of Rs 100 crore by former Mumbai Police Commissioner Parimbir Singh and Antilia case, Mansukh Hiren death case and allegations of bribery in the name of transfer, party leaders have met Governor Koshyari. BJP leaders have asked the governor to intervene in the cases of Parambir Singh, transfer controversy and Sachin Vaze.

News English Title: Delegation BJP leaders led Devendra Fadnavis meet state governor Bhagat Singh Koshyari news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या