मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशाचा कारभार चालवतात | मग टीका मुख्यमंत्र्यांवरचं का? - उपमुख्यमंत्री

पंढरपूर, १८ ऑक्टोबर : “मागील४-५ दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. नुकसानभरपाईपासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करावा”, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. अजित पवारांनी आज (१७ ऑक्टोबर) अतिवृष्टीमुळे पंढरपूर तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांची व चंद्रभागा नदीवरील येथील कुंभारघाट येथे भेट देवून पाहणी केली. कुंभारघाटावरील संरक्षित भिंत कोसळल्यामुळे सहा जण मरण पावलेल्या कुंटुबियांच्या नातेवाईकांची भेट उपमुख्यमंत्र्यांनी घेतली.
अजित पवार यावेळी म्हणाले, परतीच्या पावसाने अतिवृष्टी झाल्यामुळे महाराष्ट्रात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीसोबतच घरांचे व पशुधनाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे व घरांचे तातडीने पंचनामे करावेत. पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सुरु असलेल्या घाटांचा तसेच इतर कामांचा दर्जा व गुणवत्ता चांगली राहिल, याबाबत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. घाटबांधकामाबाबत चौकशी करुन दोषी कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशाचा कारभार चालवतात. मग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्राचा कारभार चालवला तर, विरोधकांनी मुख्यमंत्र्यावर टीका का करावी, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना लगावला. शनिवारी पंढरपूर दौऱ्यात ते पत्रकारांशी बोलत होते.
हजारो कोटी रुपये खर्च करून जलयुक्त शिवार योजना राबवली गेली. कॅगनेच या योजनेबाबत मुद्दे उपस्थित केले आहेत. तसेच कॅगद्वारेच याची चौकशी होत आहे. त्यामुळे कुणाची आकसापोटी चौकशी करण्याचे काम मुख्यमंत्र्यांकडून होत नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. पुणे, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद आणि सांगली जिल्ह्याला पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याचेही ते म्हणाले.
News English Summary: Prime Minister Narendra Modi runs the country through video conferencing. Then, if Chief Minister Uddhav Thackeray runs Maharashtra through video conference, then why should the opposition criticize the Chief Minister, Deputy Chief Minister Ajit Pawar asked the opposition. He was talking to reporters during his visit to Pandharpur on Saturday.
News English Title: Deputy Chief Minister Ajit Pawar commented over PM Narendra Modi And CM Uddhav thackeray working style News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल