22 December 2024 7:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

चंद्रकांत पाटील महसूलमंत्री असताना त्यांच्यावर आ. राजेश क्षीरसागर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते - उपमुख्यमंत्री

Deputy Chief Minister Ajit Pawar

मुंबई, ०१ जुलै | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करण्यात आलीय. भारतीय जनता पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीत याबाबतचा ठराव पारित करण्यात आला होता. त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना एक निवेदन पाठवलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या या ठरावावर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलंय. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांना खोचक टोलाही लगावला आहे. ते नाशिकमधील खरिप हंगामाच्या आढावा बैठकीनंतर बोलत होते.

ज्या आरोपीनं पोलीस खात्यात असताना वातावरण खराब केलं. त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? असा सवाल अजित पवार यांनी केलाय. चंद्रकांत पाटील यांच्याकडे ज्यावेळी महसूलमंत्रीपद होतं, तेव्हा तिथले आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. चंद्रकांतदादांबद्दल त्यांनी खूप काही सांगितलं होतं. उद्या एखादा आरोपी अजून कुणाचं नाव घेईल मग कसं चालेल? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केलाय. चंद्रकांत पाटील यांना काही सुचत नाही. कुठल्या पक्षाच्या अधिवेशनात असा ठराव झाल्याचं पाहिलं नाही. एखाद्या आरोपीवर किती विश्वास ठेवायचा हे जनतेनं ठरवायचं आहे, अशी प्रतिक्रिया अजितदादांनी दिलीय.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर दगडफेक झाली होती. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी (1 जुलै) दुपारी दोन युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनवर दगडफेक केली आहे. दोन्ही युवक दगडफेक करून स्वतः फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे हजर झाले. रामलाल चौक (सोलापूर) येथील राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयावर ही दगडफेक करण्यात आली आहे. शरनू हांडे आणि सोमनाथ घोडके अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हास्यापद म्हणजे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील शोभेच्या झाडाच्या कुंडीखालील दगड कार्यालयाच्या काचांवर भिरकावले खरे, मात्र संबंधित हल्लेखोर युवकांना काचा फुटतील एवढाही जोर लावता नसावा असं चित्र घटनास्थळी पाहायला मिळालं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Deputy Chief Minister Ajit Pawar criticism on BJP’s resolution on CBI probe news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x