22 January 2025 3:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या
x

सगळ्या लोकप्रतिनिधींना अडवून गाडा बोलणारे पण लोकप्रतिनिधीच आहेत - अजित पवार

Deputy CM Ajit Pawar

पुणे, १५ जून | मराठा आरक्षणासाठी काल छत्रपती संभाजीराजे यांनी उदयनराजेंची पुण्यात भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये मराठा आऱक्षणाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदयनराजेंनी संभाजीराजेंच्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं. तसंच संभाजीराजे यांनी अनेक मुद्द्यांवर एकमत झाल्याचं सांगितलं.

दरम्यान यावेळी उदयनराजे यांनी लोकप्रतिनिधी तसंच राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. लोकप्रतिनिधींना अडवून गाडलं पाहिजे अशी भूमिकाच त्यांनी मांडली. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आज (१५ जून) प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवारदेखील उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उदयनराजेंनी लोकप्रतिनिधींना अडवून गाडण्याची भूमिका घेतल्यासंबंधी विचारण्यात आलं असता अजित पवार म्हणाले की, सगळ्या लोकप्रतिनिधींना? सगळेच लोकप्रतिनिधी आहेत बोलणारे पण लोकप्रतिनिधी आहेत, असं म्हणत चिमटा काढला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Deputy Chief Minister Ajit Pawar criticized BJP MP Udayanraje Bhonsale over his statement news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x