उपमुख्यमंत्र्यांकडून सर्व रुग्णालयांचे तात्काळ ऑडीट करण्याचे निर्देश
मुंबई, ९ जानेवारी: भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतीचं फायर ऑडिट झालं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात बाळांच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल आता विचारला जात आहे. दरम्यान भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात 10 बाळांचा जीव गेल्यानंतर सरकार जागं झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, आता राज्यातील सर्व रुग्णालयांचं ऑडिट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. (Deputy Chief Minister Ajit Pawar has instructed to audit all the hospitals in the state)
भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन अजित पवार यांनी दिले.
भंडारा जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांसाठी असलेल्या दक्षता विभागात शुक्रवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळं अचानक आग लागली. त्यात दहा चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळं महाराष्ट्र हादरला असून सरकारी रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी संवाद साधून तपासाचे निर्देशही दिले आहेत.
News English Summary: A shocking matter has come to light that the fire audit of Bhandara district government hospital building has not been done. So who is responsible for the death of 10 newborns in a fire at a district hospital? Such a question is being asked now. Meanwhile, the government has woken up after 10 babies died at the Bhandara district government hospital. Because now Deputy Chief Minister Ajit Pawar has instructed to audit all the hospitals in the state.
News English Title: Deputy Chief Minister Ajit Pawar has instructed to audit all the hospitals in the state news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय