16 April 2025 7:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
x

BREAKING | कोल्हापुरात उपमुख्यमंत्री आणि श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट, मालोजीराजेही उपस्थित

Deputy Chief minister Ajit Pawar

कोल्हापूर, १४ जून | कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. आज (दि.14) त्यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली आहे. कोल्हापूरातील न्यू पॅलेस येथे ही भेट होत आहे. या भेटीवेळी संभाजीराजे छत्रपती यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे हेदेखील उपस्थित आहेत. या भेटीत नेमकं काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी सकाळीच अजित पवारांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची न्यू पॅलेज इथे भेट घेतली आहे. ही भेट पूर्वनियोजित नव्हती. आज सकाळी अजित पवार अचानकपणे शाहू छत्रपती यांच्या भेटीसाठी न्यू पॅलेस येथे दाखल झाले. 16 जूनला कोल्हापुरातून मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. मराठा आरक्षणाविरोधात संभाजीराजेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आता या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे.

या भेटीनंतर अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याच्या कामाला लागतील. सध्या कोल्हापूर हा राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सोबत दोन्ही नेत्यांची बैठक होईल.कोल्हापुरात काल दिवसभरात 1586 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर 30 जणांचा मृत्यू झाला होता.

 

News Title: Deputy Chief Minister Ajit Pawar meet Shahu Chhatrapati in Kolhapur news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या