निलेश कसा आहेस…रुग्ण सेवा करतो आहेस पण स्वत:ची काळजी घे, काही लागलं तर फोन कर

पुणे, १२ मे | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके हे सध्या चर्चेचा विषय ठरलेले आहेत. पारनेरमध्ये उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये आमदार निलेश लंके रात्रंदिवस रुग्णांच्या सेवेसाठी इथेच मुक्काम करत आहेत. निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने हे कोविड सेंटर उभारले आहे. आता याची महती संपूर्ण जगभरात पसरताना दिसत असून, जगभरातून मदतीचा हात या कोविड सेंटरसाठी पुढे केला जात आहे.
पारनेरला आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर मुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळालाय. विशेष म्हणजे आमदार लंके स्वतः रात्रंदिवस या कोविड सेंटर मधील रुग्णांची देखभाल करत आहेत. त्यामुळे लंके यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कोविड सेंटर सुरू केल्यापासून आतापर्यंत भरभरून मदत या सेंटरला मिळाली आहे.
राष्ट्रवादीचे निलेश लंके यांनी उभारलेल्या 1 हजार 100 बेडच्या भव्य कोविड सेंटरमधील 100 बेडला ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटरला केवळ परदेशातून 1 कोटी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. निस्वार्थी भावनेने काम केलं तर हजारो हात देणारी असतात, असं मत निलेश लंके यांनी व्यक्त केलं. आतापर्यंत पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि कॅनडा या देशातून आर्थिक मदत मिळाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पाच हजाराहून अधिक लोकांनी मोफत उपचार घेऊन सुखरुप घरी परतले तर आता दुसर्या लाटेत 14 एप्रिलपासून सुरु केलेल्या या कोविड सेंटरमध्ये 2,500 लोक उपचार घेऊन घरी परतले आहेत. सध्या एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
दरम्यान, आमदार निलेश लंकेच्या या समाज कार्यांचा आढावा काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी घेतला होताच. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही त्यांच्या या कामाची दखल घेतली आहे. सध्या निलेश लंके यांचे व्हिडीओ, बातम्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. कोरोना सेंटरमध्येच आमदार निलेश लंके जेवण करतात. तिथेच राहतात. सगळ्या लोकांची आपुलकीने काळजी घेतात. निलेश लंके यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंकेंना फोन केला आणि त्यांची विचारपूस केली आहे.
हॅलो, मी अजित पवार बोलतोय, निलेश कसा आहेस…अरे बाबा तू स्वत:ची काळजी घे. रुग्णांची सेवा करतोय हे वाचून,व्हिडीओ पाहून आनंद वाटला. पण स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नको, काळजी घेत जा, आणि काही लागलं तर फोन कर असा मोलाचा सल्ला अजितदादांनी आमदार निलेश लंकेंना दिला आहे.
News English Summary: Nilesh Lanka has set up NCP President Sharad Pawar Arogya Mandir at Bhalvani and has provided 1100 beds for corona victims. Not only that, MLA Nilesh Lanka himself is present here and is seen taking care of the people like a man of the house.
News English Title: Deputy CM Ajit Pawar called NCP MLA Nilesh Lanke for his social service during corona pandemic news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK