22 January 2025 2:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

सोशल डिस्टन्स | अजित पवारांकडून मनसे नगरसेवकाचा एकेरी शब्दात अपमान

Deputy CM Ajit Pawar, MNS corporator, Pimpari Chinchvad

पिंपरी चिंचवड, ०७ ऑगस्ट : राज्यात काल सलग दुसऱ्या दिवशीही १० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ११ हजार ५१४ इतके रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ७९ हजार ७७९ इतकी झाली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात विक्रमी संख्येनं करोना रुग्णांची नोंद होत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढतेच आहे. काल राज्यात तब्बल १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेटही ६५.९४ %वर पोहोचला आहे. आत्तापर्यंत एकूण ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण करोनाची लढाई जिंकून घरी सुखरुप परतले आहेत. राज्यातील विविध रुग्णालयांत एकूण १ लाख ४६ हजार ३०५ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या राज्यात ९ लाख ७६ हजार ३३२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ३७, ७६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

दरम्यान, पुणे आणि पिंपरीत देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सला मोठं महत्व आल्याचं पाहायला मिळत आहे. आमचे चार मंत्री पॉझिटिव्ह आले आहेत. लांबून बोलणं, फिजिकल डिस्टन्स ठेवण्यावरून मनसेचे गटनेते आणि नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. मात्र, एव्हढीच काळजी होती तर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलवलाच कशाला, ऐकूणच घ्यायचं नव्हतं तर निमंत्रण दिलेच कशाला, असा सवाल आता नगरसेवक सचिन चिखले यांनी केला आहे. एवढंच नाही तर अजित पवारांच्या वर्तणुकीवरही नाराजी व्यक्त केली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जम्बो कोविड सेंटरच्या नियोजित स्थळाची पाहणी केली. या दौऱ्यात सेंटरची माहिती घेण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासनातील सुमारे 40 हून अधिक अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं तर त्याहीपेक्षा जास्त संख्येने पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित झाल्याने आधीच सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता.

याच दौऱ्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने महापालिकेतील सर्व पक्षाच्या गट नेत्यांनाही आमंत्रित केलं होतं. त्यानुसार आपण प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची माहिती देण्यासाठी, कोरोनाबाधितांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याची माहिती देण्यासाठी मनसेचे नगरसेवक सचिन चिखले हेही उपस्थित होते. मात्र अजित पवारांनी एकूण घेणं तर दूरच उलट एकेरी उल्लेख करत आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचं मनसेचे गट नेते तथा नगरसेवक सचिन चिखले यांनी अजित पवारांच्या वर्तवणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

 

News English Summary: MNS corporator Sachin Chikhale was also present to inform the coroners that oxygen beds were not available. However, MNS group leader and corporator Sachin Chikhale has expressed displeasure over Ajit Pawar’s behavior.

News English Title: Deputy CM Ajit Pawar lashes out at MNS corporator at Pimpari Chinchvad News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x