20 April 2025 1:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचं वृत्त | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पहिल्यांदाच भाष्य

Deputy CM Ajit Pawar, Eknath Khadse, Joining NCP

मुंबई, १६ ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून यावर अजून काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नसलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलंय. राजकीय जीवनात अनेक भेटीगाठी होत असतात, त्यामुळे भेट झाली म्हणजे काही तरी काळंबेरं आहे असं समजू नये, असं अजित दादा म्हणाले.

अजित पवारांच्या हस्ते पुण्यात विधान भवन येथे रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. राजकारणात अनेकदा भेटीगाठी चालूच असतात. भेट झाली म्हणजे नक्की काही तरी काळंबेरं आहे असा अर्थ होत नाही. भाजप सत्तेत असतानाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून भाजपच्या नेत्यांना भेटायचो. तुम्ही मला गेली कित्येक वर्ष ओळखता, असंही अजित पवार म्हणाले. खडसेंबद्दल बोलताना पुढे त्यांनी स्पष्ट केलं की, “एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला दिली आहे”.

अजित पवार यांनी यावेळी जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरुन होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं. ते म्हणाले की, “हे जाणुनबुजून करत नाही. कॅगच्या अहवाल दोन दिवसांच्या अधिवेशनात सादर करण्यात आला होता. कॅगच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तशा पद्धतीच्या सूचना गेल्या आहेत”

 

News English Summary: The entry of senior BJP leader Eknath Khadse into the NCP is hotly debated. Although no explanation has been given by the NCP yet, this is the first time that NCP leader and Deputy Chief Minister Ajit Pawar has commented on it. There are many meetings in political life, so meeting should not be considered as something black, said Ajit Dada.

News English Title: Deputy CM Ajit Pawar on reports of BJP Leader Eknath Khadse Joining NCP News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या