22 December 2024 2:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा
x

विधानपरिषदेच्या १२ जागा | राज्यपाल कोर्टात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत

Deputy CM Ajit Pawar, Governor Bhagatsingh Koshyari, MLC twelve members

मुंबई, १० फेब्रुवारी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधानपरिषेदच्या 12 जागांसाठी न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत, असं म्हटलंय. ते नाशिक येथे बोलत होते. बहुमत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सर्व निकष पाळत योग्य त्या नावांची शिफारस केली आहे. राज्यपालांना रीतसर सगळं कळवलेलं आहे, असं अजित पवार म्हणाले. त्यांनी यावेळी कोरोना महामारीमुळं राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, शेतकरी आंदोलन, नाशिक नियो मेट्रोयाविषयांवर भाष्य केलं. त्याशिवाय महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असंही ते म्हणाले.

विधानसभेत बहुमत असणाऱ्या सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन नियमात बसणारे 12 लोक ठरवले आहेत. राज्यपाल त्यांची भूमिका जाहीर करतील अशी अपेक्षा करतील, अशी अपेक्षा असल्याचं अजित पवार म्हणाले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांनी विधानपरिषेदच्या 12 जागांबाबत आता अंत पाहू नये, असं पुण्यातही म्हटलं होते.

पुढे अजितदादा म्हणाले की, “केंद्र सरकारनं दोन पावलं मागं यावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वीच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाले. तोच भावूकपणा शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला तर बरं होईल, असं म्हणत अजित पवारांनी मोदींना टोला लगावला आहे. “महाविकास आघाडीत कोणतेही वाद नाहीत. कोणताही निर्णय घेताना उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी एकत्र बसून घेतील’, असं सांगत अजित पवारांनी यांनी अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.

 

News English Summary: Deputy Chief Minister Ajit Pawar has said that he will not allow Governor Bhagat Singh Koshyari to go to court for 12 seats in the Legislative Council. He was speaking in Nashik. The Chief Minister, who has a majority, has recommended the right names following all the criteria. The Governor has been duly informed, said Ajit Pawar. He also commented on the impact of Corona epidemic on the state’s economy, farmers’ agitation and Nashik Neo Metro. Apart from that, there are no differences in the Mahavikas Aghadi, he added.

News English Title: Deputy CM Ajit Pawar said governor Bhagatsingh Koshyari will not forced us to go court on MLC twelve members appointment news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x