22 December 2024 10:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price
x

संजय राठोड प्रकरणात चौकशीअंती वस्तुस्थिती समोर येईल, अनेकदा बिनबुडाचे आरोप होत असतात - अजित पवार

Sanjay Rathod

पुणे, १५ ऑगस्ट | पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केल्यानंतर मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. इतकच नाही, तर अजूनही तीच मागणी करून छळत असल्याचा आरोपही त्या पीडित ३० वर्षीय महिलेने केला होता.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अनेक विषयांना हात घातला त्यामध्ये संजय राठोड यांच्यावरील आरोपांसंदर्भात होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर एका महिलेने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांविषयी विचारले असता अजित पवार म्हणाले, अशा प्रकरणात चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर आली पाहिजे. कधीकधी बिनबुडाचे आरोप देखील होत असतात.

सरकार चालवत असताना वेगवेगळे आरोप-प्रत्यारोप होत असतात.. काही आरोपात तथ्य असतं तर काही आरोपात तथ्य नसते. यापूर्वी जेव्हा आरोप झाले तेव्हा जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय संजय राठोड यांनी घेतला होता. त्याची चौकशी आता अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर आता हा दुसरा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीची पोलीस विभागाकडून अडीच तास चौकशी देखील करण्यात आली आहे. त्या चौकशीतून खरी वस्तुस्थिती लोकांसमोर येईल.

SIT’ने जबाब नोंदवला:
घाटंजी तालुक्यातील एका महिलेने माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तपासासाठी एसआयटी पथकाची स्थापना केली होती. हे पथक शनिवारी घाटंजी पोलीस ठाण्यात दाखल झाले होती. तक्रारदार महिलेच्या गावात हे पथक काल हजर झालं होतं आणि संबंधित पीडित महिलेचा संपूर्ण जबाब नोंदवण्यात आला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Deputy CM Ajit Pawar talked on allegations against Shivsena MLA Sanjay Rathod news updates.

हॅशटॅग्स

#SanjayRathod(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x