5 November 2024 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News
x

बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्र्यांचं सूचक विधान | संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय होणार

Ajit pawar

मुंबई, १० एप्रिल: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, राज्य सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं. महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे सध्या वीकेंड लॉकडाऊन आणि निर्बंध असले तरीही वाढती रुग्णसंख्या आणि मृतसंख्या पाहता, महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लावला जाऊ शकतो.

या बैठकीकडे सगळ्याचं लक्ष असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं विधान केलं आहे. अजित पवार म्हणाले, “आज बैठक आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेऊन चालणार नाही. आज बारामतीत बैठक घेऊन इंजक्शन, बेड, लसीकरण, रुग्णवाहिका याचा आढावा घेतला. बारामतीत होत असलेली वाढ रोखण्यासाठी काही निर्बंध लादण्याबद्दल पोलिस यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.

राज्य शासनाच्या एकाही हॉस्पिटलमध्ये रेमडिसीव्हरचा इंजक्शन कमी पडत नाही. खासगी रुग्णालयांमध्ये तुटवडा आहे. त्यामागे काही कारणे आहेत. त्याबद्दलही चर्चा झाली. जिल्ह्यात याबद्दल कशा पद्धतीने उपाययोजना राबवायच्या याबद्दल पुण्यातील बैठकीत निर्णय घेणार आहोत, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.तसेच, आज मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांच्या उद्यापासून दुकाने उघडण्याच्या भूमिकेबद्दल चर्चा करुन त्याबद्दल आज रात्री किंवा उद्या निर्णय जाहीर केला जाईल, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

 

News English Summary: Deputy Chief Minister Ajit Pawar has made an important statement. Ajit Pawar said, “Today is the meeting. The Chief Minister called an all-party meeting. In it, only one decision will be taken for the whole of Maharashtra. Not every place will have a different decision to make. A meeting was held in Baramati today to review injections, beds, vaccinations and ambulances. The police have been instructed to impose some restrictions to curb the rise in Baramati.

News English Title: Deputy CM Ajit Pawar talked on meeting regarding corona pandemic in state news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x