14 November 2024 12:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Notice | क्रेडिट कार्ड वापरता, क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी बातमी, थेट इन्कम टॅक्सची नोटीस येईल दारी - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजी वाढणार - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IDEA Horoscope Today | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा राहील, जीवनात आनंद आणि समाधान प्राप्त होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला काय - NSE: SUZLON IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल तगडा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC
x

गडकरींच्या आरोपात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावे लागेल, परंतु, कुठल्याही....

DCM Ajit Pawar

पुणे, १५ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना शिवसेनेचे स्थानिक प्रतिनिधी विरोध करत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची कामे रखडली असल्याचे सांगितले होते. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून नितीन गडकरी यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावे लागेल, असे पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी आज (रविवारी) 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या, यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, मागील तीस वर्षांपासून मी समाजकारणात काम करतोय, त्यामुळे मी नेहमी सांगतो की हा पैसा जनतेचा असतो. जनतेच्या पैशाचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे, होणाऱ्या कामाचा दर्जा राखला पाहिजे. कामाचा दर्जा चांगला राखला जात नसेल तर संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे. परंतु जर एखादा ठेकेदार चांगले काम करत असतानाही काही जण एखाद्या राजकीय पक्षाचा आधार घेऊन, मिळालेल्या पदाचा आधार घेऊन जर त्रास देत असेल तर तो ही त्रास ताबडतोब थांबवला गेला पाहिजे. या संदर्भातील पत्र आता थेट मुख्यमंत्र्यांनाच गेले आहे.

मागील पावणेदोन वर्षांपासून मी मुख्यमंत्र्यांसोबत काम करतोय. त्यांच्या कामाची पद्धत मला माहित आहे. कामाचा दर्जा चांगला राखण्यासाठी त्यांचा नेहमी कटाक्ष असतो असतो. अधिकाऱ्यांची बैठक होते तेव्हाही कामाचा दर्जा आणि वृक्षतोड कशी टाळता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात ते बारकाईने लक्ष घालतील, त्याची शहानिशा करतील याची मला शंभर टक्के खात्री आहे. परंतु, कुठल्याही कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने विकास कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करता कामा नये, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Deputy CM Ajit Pawar talked on Nitin Gadkari’s letter to CM Uddhav Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x