5 November 2024 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News
x

महाविकास आघाडी सरकार पडणारा अजून जन्माला यायचा आहे | हे येरा गबाळ्याचे काम नाही - उपमुख्यमंत्री

Pandharpur Mangalvedha

पंढरपूर, १५ एप्रिल: राज्यात एकीकडे कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली असताना दुसरीकडे मात्र पंढरपूर मंगळवेढा निवडणूकीचा धुरळा उडाला आहे. १७ एप्रिलला पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक पार पडणार असून राष्ट्रवादी आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. या पंढरपूर पोटनिवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यातील आघाडी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. सरकार पाडणे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यांदाच थेट निशाणा साधला आहे.

अजित पवारांनी बोलायला सुरुवात करतानाच म्हटले की, राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नससो. आणि राज्यातील आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले. काल सायंकाळी पंढरपूर येथील शिवाजी चौकात राष्ट्रवादी उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराची सभा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.

भाजपने ५ वर्षे केवळ राजकारण केले, भारत भालके काँग्रेसचे आमदार होते म्हणून भाजपाने २४ गावांच्या पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. मी पंतप्रधान मोदी यांच्याकडून पैसे आणतो, असा सांगावा फडणवीस आज करत आहेत. मात्र, मोदींनी महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटी परतावा अद्याप दिला नाही, मग इतर मागण्यांचे काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विचारला

आजवर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर इतक्या थेट शब्दात कधी बोलले नव्हते. मात्र आजची राष्ट्रवादीची सभा ही फडणवीसांच्या सभेला उत्तर देणारी सभा ठरली. आजच्या सभेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांच्या भाषणाचा रोख हा फडणवीस यांच्या त्याच वक्तव्यावर होता.

 

News English Summary: Deputy CM Ajit Pawar has strongly responded to the criticism made by Leader of Opposition Devendra Fadnavis on the Mahavikas Aghadi government in the Pandharpur by-election. The one who overthrew the leading government in the state is yet to be born. For the first time, Ajit Pawar has directly targeted Devendra Fadnavis, saying that overthrowing the government is not the job of anyone.

News English Title: Deputy CM Ajit Pawar targets Devendra Fadnavis challenge in Pandharpur Mangalvedha by poll election news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x