पंढरपूर | जनतेसाठी एक संधी आहे, लोकहितविरोधी सरकारविरोधात मतदान करा - फडणवीस
पंढरपूर, १२ एप्रिल: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जरी वाढला असला तरी निवडणूकींचा धुरळा जोरदार उडत आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक तोंडावर आली असून भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सभांचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ आवडाडे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभा घेत धमुाकूळच घातला. त्यातही काल (११ एप्रिल) जयंत पाटील यांनी भर पावसात घेतलेली सभा तर जास्तच गाजली. त्यांच्या याच सभेवरुन भाजप नेते आता राष्ट्रवादीला लक्ष करत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचार सभेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, पंढरपूर पोटनिवडणूक ही जनतेसाठी एक संधी आहे. लोकहितविरोधी सरकारविरोधात मतदान करा. हे महाविकास आघाडी सरकार नाही तर महावसुली सरकार आहे. पोलिसांकडून, शेतकऱ्यांकडून, जनतेकडून वसुली करण्यासाठी सरकार काम करतंय. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, मृत्यू महाराष्ट्रात, देशात जेवढे मृत्यू होतायेत त्यातील ५० टक्के मृत्यू महाराष्ट्रात होतायेत. ही अवस्था या सरकारने करून ठेवली आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत महाराष्ट्रात लोकशाही नव्हे तर लॉकशाही सुरू आहे. हे आवश्यक असलं तरी जेव्हा लॉकडाऊन करतो तेव्हा जे लोक रोजंदारीवर जगतात. अशा सामान्य माणसांना मदत करण्यासाठी तिजोरीत हात घातला पाहिजे. अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचं भान सरकारला नाही. सरकारला मायबाप का म्हणतो कारण त्यांनी अडचणीत असलेल्या मुलांना मदत केली पाहिजे. सरकारनं मदत केलीच नाही पण वीजबिलाची वसुली मुघलांप्रमाणे केली आहे असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केली.
दुसरीकडे सदाभाऊ खोत यांनी देखील राष्ट्रवादीवर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गल्लोगल्ली फिरत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पावसात भिजण्यापेक्षा ३५ गावांचा पाण्याच्या प्रश्न मिटवावा. तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्याची जमीन भिजवा, अशा कणखर शब्दांत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला आहे. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बोराळे गावात भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी खोत उपस्थित होते तेव्हा त्यांनी ही टीका केली आहे.
News English Summary: Devendra Fadnavis targeted the ruling party during the election campaign rally. Fadnavis said the Pandharpur by-election is an opportunity for the people. Vote against an anti-people government. This is not a Mahavikas Aghadi government but a Mahavasuli government.
News English Title: Devendra Fadnavis attacked on NCP party during campaign of Pandharpur Mangalvedha by poll election news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम