19 April 2025 10:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

मुंबई पोलिसांचं तोंड काळं झालं' या त्यांच्या वक्तव्यात भविष्यातील कारवाईचे आधीच खात्रीचे संकेत?

Mumbai Police, Sachin Vaze, NIA

मुंबई, १४ मार्च: मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली, असा आरोप NIA नी केला आहे.

अनिल अंबानी यांच्या घराजवळ कार उभी करण्यात सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केला असून, याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली आहे. वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयए न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. त्यांच्या कोठडीची मागणी एनआयकडून केली जाणार आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दा विधिमंडळात लावून धरल्यानं सरकारची प्रचंड कोंडी झाली होती. याच प्रकरणावरून राऊत यांनी शंका उपस्थित करत फडणवीसांना टोला लगावला आहे. “अर्णब गोस्वामीसारख्यांना पोलिसांनी तेव्हा कोणाच्या हुकूमाने वाचविले?,” असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राज्य अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेंना लक्ष करताना ‘मुंबई पोलिसांचं तोंड काळं झालं’ असं धक्कादायक वक्तव्य केलेलं. काल मुंबई पोलिसांच्या बाबतीत घडून आलेला घटनाक्रम हा फडणवीसांना भविष्यातील कारवाईची आधीच माहिती होती का अशी शंका सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित होऊ लागली आहे. राज्यात ईडी किंवा CBI वापर करून राज्य सरकारला लक्ष केलं जाईल असा आधी अंदाज होता. मात्र NIA कडून अशी काही कारवाई थेट मुंबई पोलिसांविरोधात एखाद्या विषयाआडून होईल याची राज्य सरकारला देखील कल्पना नव्हती. त्यासाठीच जिलेटीनच्या नळकांड्याच्या आडून NIA’ला यामध्ये इंट्री द्यावी अशी मागणी फडणवीसांनी आणि दरेकरांनी विधिमंडळात उचलून धरली आणि तिथेच गृहमंत्री फसले असा अंदाज व्यक्त होऊ लागलं आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणात सर्वाधिक माहिती ही राज्य ATS टीमकडे होती. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतः NIA माहिती ATS कडून घेत असताना त्यांच्याकडून एक-दोन दिवसात एवढं मोठं पाऊल कसं काय उचलण्यात आलं असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. काही शंका या संजय राऊत यांनी देखील अप्रत्यक्षरीत्या व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मुंबई पोलीस आक्रमक कारवाईत उतरले तर मोठा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी मनसुख हिरेन, अंबानी स्फोटकं प्रकरण सवाल उपस्थित करत रोखठोक सदरातून भाष्य केलं आहे. मनसुख हिरेन या व्यावसायिकाच्या मृत्यूने महाराष्ट्राचे राजकारण सध्या ढवळून निघाले. त्या ढवळण्यातून विरोधी पक्षाने काय मिळवले, याचे उत्तर ‘गमावलेला आत्मविश्वास’ असेच द्यावे लागेल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दीड वर्षात प्रथमच विरोधी पक्षनेता म्हणून सूर सापडला. आठ दिवसांच्या अधिवेशनात संपूर्ण ‘फोकस’ विरोधी पक्षनेत्यांवर राहिला हे सगळ्यात मोठे यश.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या मते गाडीचा मालक मनसुख व सचिन वाझे हे चार महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. ज्या मनसुखचा संशयास्पद मृत्यू झाला त्याचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत सापडला हे सर्व प्रकरण म्हणूनच रहस्यमय झाले, पण रहस्य व सत्य यात फरक आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी गुप्तहेर शेरलॉक होम्सप्रमाणे या प्रकरणाचा तपास केला व काही गोष्टी समोर आणल्या. एखाद्या निष्णात फौजदारी वकिलाप्रमाणे संपूर्ण केस विधानसभेत मांडली. त्यांचे वकिलीचातुर्य या वेळी वाखाणण्यासारखेच होते, पण फौजदारी वकिलाने खटला कितीही रंगतदार केला तरी न्यायदान हे पुराव्यांवरच केले जाते. मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले, पण हेच पोलीस वर्षभरापूर्वी फडणवीस यांचे हुकूम ऐकत होते. अर्णब गोस्वामीसारख्यांना पोलिसांनी तेव्हा कोणाच्या हुकूमाने वाचविले? फडणवीस यांनी मनसुख प्रकरणाचे नाट्य उत्तम रीतीने उभे केले, पण पुढे काय?, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

मनसुख हिरेन हा तावडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने बोलावले म्हणून घराबाहेर पडला तो परत आलाच नाही. तावडे नावाचे कुणी अधिकारी मुंबई क्राइम बँचच्या कांदिवली युनिटमध्ये कार्यरत नाहीत हे आता समोर आले आहे. मग या तावडेंच्या फोनचे गौडबंगाल काय?

 

News English Summary: Importantly, the state ATS team had the most information in this case. Another important point is that while the NIA itself was taking information from the ATS, questions arose as to why such a big step was taken by them in a day or two. Some doubts have also been indirectly expressed by Sanjay Raut. Therefore, if the Mumbai Police takes aggressive action in the future, there is a possibility of a major political crisis.

News English Title: Devendra Fadnavis controversial statement against Mumbai Police in state assembly and NIA action news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या