15 November 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News
x

भाजपाच एक नंबरचा पक्ष | शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही - देवेन्द्र फडणवीस

Devendra Fadnavis, MahaVikas aghadi, Gram Panchayat Election result

मुंबई, १८ जानेवारी: विधानसभेतील विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करत भारतीय जनता पक्षाला जनतेने कौल दिल्याचा दावा केला आहे. राज्यातील ग्रामपंचायच निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हाच क्रमांक एकचा पक्ष बनला असून गावागावातील लोकांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन दिले आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

ज्याप्रकारे भारतीय जनता पक्षाला लोकांनी सर्मथन दिलं आहे त्याचा मला अतिशय आनंद आहे. आम्ही समर्थन दिलेले सगळे पॅनल ग्रामपंचयातीमध्ये चांगला विजय मिळवत आहेत. विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाडा. उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल… सगळ्या भागात भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष झाला आहे. इतर पक्षांच्या तुलनेत आम्ही खूप पुढे गेलो आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये आम्ही सर्व जागा जिंकल्या आहोत. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

राज्यात गावागावांमध्ये काही आम्ही प्रचाराला जात नाही. तेथील स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेच मेहनत घेत असतात. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाराष्ट्रात काही भागात वर्चस्व आहे. शिवसेना हा काही महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही. पण भारतीय जनता पक्षाचं असं नाही. भारतीय जनता पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आम्हाला तिन्ही पक्षांच्या विरोधात यावेळी लढावं लागलं. त्यामुळे आम्हाला आता संपूर्ण महाराष्ट्रात स्पेस आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

News English Summary: Leader of Opposition in the Assembly, former Chief Minister Devendra Fadnavis, has reacted to the results of the Gram Panchayat elections in the state, claiming that the people have voted for the Bharatiya Janata Party. Opposition leader Devendra Fadnavis said that the Bharatiya Janata Party (BJP) has become the number one party in the Gram Panchayat elections in the state and people in the villages have supported the party.

News English Title: Devendra Fadnavis criticised MahaVikas aghadi on Gram Panchayat Election result news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x