15 November 2024 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे - फडणवीस

Devendra Fadnavis, CM Uddhav Thackeray, Ajit Pawar, Farmers issues

पुणे, २५ डिसेंबर: भारतीय जनता पक्षाचे आज राज्यभर शेतकरी संवाद अभियान सुरु आहे. या अभियानाअंतर्गत भाजपचे विविध नेते राज्यभर तसंच देशभरात कार्यक्रम घेऊन कृषी कायद्यांचं महत्त्व पटवून देत आहेत. पुण्यातील के. के. घुले विद्यालयाच्या मैदानात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या सभेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोदी सरकारच्या शेतकरी योजनांचा पाढा वाचत फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलं.

“मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय आणि नेहमीच राहील. शेतकऱ्याला त्याचा मालाचा योग्य मोबदला देण्यासाठी आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी कृषी कायदे आणले परंतु विरोधक या कायद्यांबद्दल खोटा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील लक्ष केलं. पुढे ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठ्या घोषणा करत शेतकऱ्याच्या बांधावर गेले होते. तिथे जाऊन शेतकऱ्याचं नुकसान होतंय आणि कमी पैसे देताय असं सांगत ५० हजार रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे असं जाहीर केलं. कोरवाहू आहेत त्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत द्यायचं सांगितलं. आमचे अजितदादा तर त्याहूनही वर निघाले. म्हणाले उद्धव ठाकरे तुम्ही ५० हजार म्हणता…बागायतदारांना दीड लाख रुपये मदत मिळाली पाहिजे. शेतकऱ्याचे कैवारी असल्याचं आम्हाला वाटलं. पण कसले दीड लाख आणि ५० हजार रुपये, राजा उदार नाही तर उधार झाला आणि हाती भोपळा आला अशी परिस्थिती आहे”.

आमच्या शेतकऱ्यांना ६ आणि ८ हजार रुपये घोषित केले आणि ते सुद्धा पोहोचले नाही. शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे,” असा संताप देवेंदर फडणवीसांनी व्यक्त केला.

 

News English Summary: The Bharatiya Janata Party (BJP) has launched a statewide farmers’ dialogue campaign today. Under this campaign, various BJP leaders are holding programs all over the state as well as across the country to emphasize the importance of agricultural laws. K in Pune. K. Leader of Opposition Devendra Fadnavis’s meeting was held at Ghule Vidyalaya ground. At this time, while reading the Modi government’s farmers’ schemes, Fadnavis castigated the opposition.

News English Title: Devendra Fadnavis criticized CM Uddhav Thackeray and DCM Ajit Pawar over farmers issues news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x