15 November 2024 3:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL
x

हात झटकण्यात तीनही पक्ष तरबेज आहेत | फडणवीसांचा खरमरीत टोला

Devendra Fadnavis, MahaVikas Aghadi government, farmers issues

उस्मानाबाद, २० ऑक्टोबर : सत्ताधारी सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात सध्या राज्यात पावसाने केलेल्या नुकसानीवरून वाद सुरू आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या उस्मानाबाद येथे दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस आज (२० ऑक्टोबर) उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

“राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. सरकारने मदतीबाबत आता कुठलेच बहाणे सांगू नये. मला आश्चर्य वाटतं, या तीन पक्षांमध्ये खूप मतभेद आहेत. पण एका बाबतीत सगळे मात्र एका सूरात बोलतात की, केंद्राने मदत करावी. त्यामुळे हात झटकण्यात तीनही पक्ष तरबेज आहेत”, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.यावेळी त्यांनी राज्य सरकावर निशाणा साधला.

“केंद्र सरकार शेतकऱ्यांना निश्चितच मदत करेल. पण राज्य सरकारनेदेखील काय मदत केली पाहिजे ते ठरवलं पाहिजे”, असं फडणवीस यांनी सुनावलं आहे. “तुम्ही राजकीय बोललात तर मीदेखील राजकीय बोलेल. मी काल दिवसभर काहीच राजकीय बोललो नाही. मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मोठी आहे. त्यांनी संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, यावर भाष्य करण्याची अपेक्षा आहे”, असे फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर देताना फडणवीसांना टोला लगावला. ‘कोंबडा आरवला किंवा नाही आरवला तरी सकाळ व्हायची थांबत नाही. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखीच अवस्था झाली आहे’, अशी बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. माझ्यामुळे इतर पक्षाचे लोक बाहेर फिरायला लागले अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीसांच्या या टीकेला मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय. कोंबडयाला वाटतं की मी आरवलो नाही तर सकाळ होणारच नाही, पण प्रत्यक्षात तसं काहीही नसतं. कोंबडा झोपला तरी सकाळ होते, हे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घ्यायला हवे, असा टोमणा मलिक यांनी लगावला. तसेच, शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात कॅबिनेट बैठकीचा मदतीचा निर्णय होईल, असेही मलिक म्हणाले.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनीही पाहणी दौरा केला असून निश्चितच राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारची राहिल, सरकार नक्कीच मदत जाहीर करेल. केंद्र सरकारनेही मदत करण्याची जबाबदारी घ्यावी, राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये मदतीसाठी निर्णय घेतला जाईल, असे मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय.

 

News English Summary: The state government should help the farmers immediately. The government should not make any excuses for help now. I wonder, there are so many differences between these three parties. But in one case, everyone agrees that the Center should help. Leader of Opposition Devendra Fadnavis has said that all the three parties are skilled in shaking hands. This time, he targeted the state government.

News English Title: Devendra Fadnavis criticized MahaVikas Aghadi government over farmers issues news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x